मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

चेहरा बघून लोक घाबरायचे, म्हणून नोकरीवरून काढलं

चेहरा बघून लोक घाबरायचे, म्हणून नोकरीवरून काढलं

सौंदर्याच्या व्याख्येत सध्याचा तीचा चेहरा बसत नाही. झोपेत देखील तीचा एक डोळा उघडा राहतो. चेहऱ्यासोबत तीच्या शरिरावरील काही भागही अॅसिड हल्ल्यात जळला आहे. (acid attack survivor)घडलेल्या घटनेला सामोरे जात अनमोल जेव्हा आज रॅम्पवर चालताना स्माईल देते तेव्हा संपुर्ण स्टेज तीच्या हास्याने चमकुन उठतो. 22 वर्षीय अनमोलची हि कहाणी आहे.

सौंदर्याच्या व्याख्येत सध्याचा तीचा चेहरा बसत नाही. झोपेत देखील तीचा एक डोळा उघडा राहतो. चेहऱ्यासोबत तीच्या शरिरावरील काही भागही अॅसिड हल्ल्यात जळला आहे. (acid attack survivor)घडलेल्या घटनेला सामोरे जात अनमोल जेव्हा आज रॅम्पवर चालताना स्माईल देते तेव्हा संपुर्ण स्टेज तीच्या हास्याने चमकुन उठतो. 22 वर्षीय अनमोलची हि कहाणी आहे.

सौंदर्याच्या व्याख्येत सध्याचा तीचा चेहरा बसत नाही. झोपेत देखील तीचा एक डोळा उघडा राहतो. चेहऱ्यासोबत तीच्या शरिरावरील काही भागही अॅसिड हल्ल्यात जळला आहे. (acid attack survivor)घडलेल्या घटनेला सामोरे जात अनमोल जेव्हा आज रॅम्पवर चालताना स्माईल देते तेव्हा संपुर्ण स्टेज तीच्या हास्याने चमकुन उठतो. 22 वर्षीय अनमोलची हि कहाणी आहे.

पुढे वाचा ...
    18,जानेवारी: मी रस्त्यावरुन चालते तेव्हा आजुबाजूचे सर्वजण माझ्याकडे बघून कुजबुजतात , अगदी थांबून थांबून माझ्याकडे बघतात. बस किंवा ट्रेनमध्ये बसल्यावर माझ्या शेजारचे लोक माझ्यापासून दूर होतात, एखादा संसंर्गजन्य (contagious disease) आजार झाल्यासारखी वागणुक मिळते. मला मिळत असलेली वागणुक खुप वेदनादायक आहे. यासगळ्याचा आधी खुप त्रास झाला. पुर्वी खुप रडायचे, आता रडणं सोडून दिलं आहे, आता हसते, सगळ्यांकडे हसून बघते. हि आपबिती आहे 22 वर्षांच्या अनमोलची. अनमोल, जीचं अॅसिड हल्यात शरीर जळालं पण स्वप्नं आणि जगण्याची आशा जीवंत आहे. त्यादिवशी पप्पा खुप रागात घरात आले. मी दोन महिन्यांची आईच्या मांडीवर, तीच्या कुशीत झोपले होते. तेव्हाच वडिलांनी आईच्या अंगावर अॅसिड फेकलं. आईवर टाकलेलं अॅसिड उडून माझ्या अंगावरही आलं. जळालेल्या अवस्थेत आई आणि बाळाला शेजारी राहणाऱ्या लोकांनी रुग्णालयात दाखल केलं. उपचार सुरु असतानाच आईचा मृत्यू झाला, पण मी वाचले आणि हॉस्पिटलच माझं घर बनलं. रुग्णालयातील परिचारिका (sister)माझ्या माता झाल्या. मी इतकी लहान होते की मला काहीच आठवत नाही. नर्सेसच्या तोंडूनच मी आईसोबत घडलेली घटना ऐकत असते एखाद्या परिकथेतल्या गोष्टीप्रमाणे. माझ्या जखमा साफ करताना जेव्हा नर्सेस आणि डॉक्टर रडायचे तेव्हा त्यांच्या अश्रुंमध्येच मी आईचं प्रेम शोधायचे. हॉस्पिटलमध्ये जायला लोक घाबरतात. कोणाला रक्त बघुन चक्कर येते तर कोणाला औषधांचा वास सहन होत नाही. माझं तर अख्खं लहानपणच हॉस्पिटलमध्ये गेलं आहे. इथे येणारे रुग्ण माझ्यासाठी पाहुणे असायचे आणि हॉस्पिटलच माझं खेळाचं मैदान. मी इतरांपेक्षा वेगळी असल्याची वेदनादायी जाणिव देणारी वागणूक मिळाली 5 वर्षांची झाल्यावर अनाथालायत पाठवण्यात आलं. अनाथालयात मी इतर मुलांपेक्षा वेगळी नव्हते. आम्ही सर्व मुलं एकत्र खेळायचो, खोड्या काडायचो, सगळेजण बोलतात तशीच मी पण बोलायची. माझ्याएवढ्याच असणाऱ्या त्या लहान मुलांनी मला कधीच मी इतरांपेक्षा वेगळी आहे याची जाणीव करुन दिली नाही. सण, उत्सवाला मी देखील इतर मुलींप्रमाणे नटायची. छान छान कपडे घालायची. माझ्यात आणि इतर मुलांमध्य़े एकच फरक केला जायचा मला स्टेजवर कधी जावू दिलं नाही. जेव्हा की मला डान्स आणि स्टेज परफॉर्मन्सची खुप आवड. पण काही वर्षांनी मला याचं कारण समजलं. त्यांना भीती वाटत होती की मला जर मी इतरांपेक्षा वेगळी आहे हे कळलं तर त्याचा माझ्यावर काय परिणाम होईल याची. कालातरांने तेच झालं जेव्हा मी कॉलेज ला गेले तेव्हा मला कळलं की मी कुरुप आहे. खुपदा अनेकांच्या तोंडून हे ऐकायला मिळालं. सुरुवातीला तर माझ्यासोबत मैत्री कऱण्यासाठी कोणीच तयार नव्हतं कारण मी सगळ्यांपेक्षा वेगळी दिसते. एका कोपऱ्यात बसून एकटीच मी जेवण करायचे. दबलेल्या पावलांनी, मान खाली घालून, मनावर खुप सारं दडपण घेवून मी वर्गात येत असत. वर्गात लेक्चर सुरु असताना कधीच प्रश्न विचारला नाही. मी अभ्यासात खुप मागे राहिले. वर्गात सर्वात शेवटच्या बाकावर बसत असत. कॉलेजला जाणंच बंद केलं. निकाल आला तेव्हा अर्थात मी नापास झाले होते. निकाल आल्यावर अनाथालयात माझ्यासोबत कॉलेजमध्ये जे घडलं ते कळलं. पुन्हा मिळाली हिम्मत बाहेर पडण्याची अनाथालयातील सर्वांनी मला हिम्मत दिली. आणि मी पुन्हा शिकायला लागले. पहिल्यांदा नोकरीसाठी निघाले तेव्हा पुर्ण तयारी करुन निघाले. कॉर्पोरेट कल्चरला साजेसे कपडे, त्यांच्यासारखी भाषा असं सगळं. सुरुवातीला सगळं काही ठिक सुरु होतं पण काही दिवसानंतर अनाथालयातील लोकांनी मला कामावर जाण्यापासून रोखलं. ऑफिसमधील लोक माझ्यामुळे त्यांच्या कामावर लक्ष देवू शकत नव्हते. ऑफिसमधील कर्मचाऱ्यांनी HR कडे तक्रार केली. दररोज आम्ही असा चेहरा बघू शकत नाही अशी त्यांची तक्रार होती. माझ्याकडे बघितल्यानं त्यांच्या कामावर त्याचा परिणाम होतो असं त्यांचं म्हणणं होतं. आणि तेव्हा मला पहिल्यांदा मी इतरांपेक्षा वेगळी आहे हे प्रकर्षाने जाणवलं. 2 महिन्यांची असताना वडिलांनी अॅसिड फेकलं, त्या अॅसिड हल्यात आईचं निधन झालं, ज्या मुलीचं घर अनाथालय आहे, जीचा चेहरा कुरूप आहे अशा मुलीला जगात स्थान नाही या भावनेने माझ्या मनात घर केलं आणि मी खुप निराश राहु लागले. पहिल्यांदाच जशी दिसते तसा फोटो सोशल मीडियावर टाकला आणि आयुष्य बदललं बेरोजगारी आणि निराशेने हतबल झालेल्या अनमोल ने पहिल्यांदाच ती जशी दिसते तो फोटो फेसबुकवर टाकला. याआधी  सोशल मीडियावर तीने तीचा खरा फोटो कधीच वापरलेला न्हवता.  एका रात्री तीने आपला खऱ्या चेहऱ्याचा फोटो शोअर केला. सकाळी उठून तीने फेसबूक पाहिलं तर खुप साऱ्या प्रतिक्रिया आणि लाइक्स आले होते. पहिल्यांदाच तीचं अनाथालयातील लोकांशिवाय बाहेरच्या व्यक्तींनी कौतुक केलं होतं.  त्यानंतर मी सोशल मीडियावर अॅक्टीव रहायला लागले. त्यानंतर एका युनिव्हर्सिटीतील प्रोजेक्टसाठी मॉडेलिंगची ऑफर आली. एक मुलगी जिच्या चेहऱ्यामुळे तीची नोकरी गेली, तीला आता स्टेजवर चालायचं होतं. अनमोल आता सुपर मॉडल्स सोबत रॅंम्प वॉक करते अनमोल म्हणते आता मला मी इतरांपेक्षा कशी वेगळी आहे याचा फरक पडत नाही. ज्यावेळी मला मी इतरांपेक्षा वेगळी आहे हे कळलं तोपर्यंत मी माझी स्पप्नं निवडली होती. मला मॉडल बनायचं होतं आणि मी मॉडल बनले आहे. भले जळलेल्या शरिरासोबत का होइना पण मी माझं स्वप्न जगत आहे.
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    पुढील बातम्या