मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

अंतराळातून पृथ्वीकडे येतोय मोठा धोका, आदळला तर देशच्या देश होतील नष्ट?

अंतराळातून पृथ्वीकडे येतोय मोठा धोका, आदळला तर देशच्या देश होतील नष्ट?

 जर ही उल्का पृथ्वीवर आदळली तर मोठी त्सुनामी येऊ शकते.

जर ही उल्का पृथ्वीवर आदळली तर मोठी त्सुनामी येऊ शकते.

जर ही उल्का पृथ्वीवर आदळली तर मोठी त्सुनामी येऊ शकते.

  • Published by:  sachin Salve
नवी दिल्ली, 19 मार्च : अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था (NASA) ने नुकताच एक खुलासा केला आहे. एक उल्का किंवा लघूग्रह वेगाने पृथ्वीच्या दिशेनं येत आहे. असंही सांगितलं जात आहे की, हा लघूग्रह पृथ्वीवरील सर्वात उंच असलेल्या माउंट एव्हरेस्ट शिखराहूनही मोठा आहे. या उल्केचा वेग हा  31,319 किलोमिटर प्रतितास इतका आहे. म्हणजे जवळपास 8.72 किलोमीटर प्रति सेंकद या वेगाने येत आहे. जर ही उल्का पृथ्वीवर आदळली तर मोठी त्सुनामी येऊ शकते. त्यामुळे एकच हाहाकार उडेल आणि अनेक देश नष्ट होतील. परंतु, नासाने असंही स्पष्ट केलं आहे की, या उल्केपासून घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. ही भली मोठी उल्का पृथ्वीपासून 64 लाख किलोमिटर दूर अंतरावरून जाईल. अंतराळामध्ये हे अंतर खूप दूर मानले जात नाही आणि फार कमीही समजले जात नाही. काही शास्त्रांनी हा लघूग्रह पृथ्वीवर आदळणार अशी शक्यता वर्तवली आहे. या उल्केला 52768 (1998 OR 2) असं नाव देण्यात आलं आहे. ही उल्का नासाने सर्वात पहिले 1998 मध्ये पाहिले होते. या उल्केचा व्यास हा जवळपास 4 किलोमिटर इतका आहे. अशीही शक्यता आहे की, ही उल्का 29 एप्रिल रोजी पृथ्वी शेजारून जाईल. याबद्दल अंतराळ संशोधक डॉक्टर स्टीवन प्राव्दो यांनी सांगितलं की, या 52768 उल्केला सूर्याला प्रदर्क्षिणा घालण्यासाठी  1,340 दिवस किंवा  3.7 वर्ष लागतात. तर अंतराळ संशोधन आंतरराष्ट्रीय समूहाचे डॉ. ब्रूस बेट्स  यांनी सांगितलं की, अंतराळामध्ये अशा अनेक उल्का, लघूग्रह फिरत असतात. जरीही उल्का पृथ्वीच्या  दिशेनं आली तर पृथ्वीवर येण्याआधीच ती नष्ट होईल. त्यामुळे पृथ्वीला कोणताही धोका नाही. 2013 मध्ये जवळपास 20 मिटर रूंद अशी एक उल्का पृथ्वीच्या कक्षेत आदळली होती. तर एक 40 मिटरची उल्का 1908 मध्ये सायबेरियाच्या कक्षेत आदळली होती. मंगळ ग्रहावर दिसलं असं काही की नासाही झाली हैराण दरम्यान, अमेरिकेची अंतराळ संशोधन मोहिम संस्था नॅशनल अॅरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन नासा (NASA) ने मंगळ ग्रहावरील 2011 मध्ये घेतलेला फोटो प्रसिद्ध केला आहे. या फोटोमध्ये एक रहस्यमयी खड्डा दिसत आहे. Independent ने दिलेल्या वृत्तानुसार, शास्त्रांचं म्हणणं आहे की, या खड्ड्यामुळे मंगळ ग्रहावर जीवन सृष्टी असल्याचा काही पुरावा हाती लागू शकतो. जवळपास 35 मीटर रूंद असलेल्या खड्ड्याभोवती काही गुफा असल्याचं समोर आलं आहे. या फोटोवर शास्त्रांनी अजून खोलात जाऊन संशोधन केलं नाही. नासाने काही दिवसांपूर्वी एक रोबोट पाठवला होता. याचं नाव होतं ऑर्बिटर. हा रोबोट सतत मंगळग्रहावरील फोटो कॅमेऱ्यात कैद करत होता आणि तो नासाला पाठवत होता. हा फोटो सुद्धा ऑर्बिटरने पाठवला आहे. जेव्हा या खड्डाबद्दल माहिती मिळाली तेव्हा नासाच्या शास्त्रांनी  असा अंदाज व्यक्त केला ही गुफा जवळपास 20 मीटर खोल आहे. नासाने आपल्या एका ब्लॉगमध्ये स्पष्ट केलं आहे की, या गोलाकार खड्ड्याभोवती अनेक सुरक्षित गुफा असल्याचं कळतंय. याची लांबी 35 मीटर आणि खोली 20 मीटर पर्यंत असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. शास्त्र आणि अभ्यासक याबद्दल सखोल अभ्यास करत असून आणखी नवीन माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
First published:

Tags: Nasa

पुढील बातम्या