10 टक्के आर्थिक विकासदराचं आव्हान पेलणं सध्यातरी खडतर- अरुण जेटली

10 टक्के आर्थिक विकासदराचं आव्हान पेलणं सध्यातरी खडतर- अरुण जेटली

भारतीय अर्थव्यवस्थेत 10 टक्के विकास दराचं उदिष्ठं गाठण्यासाठी 2003-08 सारखी ऊर्जितावस्था येण्याची गरज आहे, एवढंच नाहीतर त्यासाठी देशांतर्गत आर्थिक सुधारणांसोबतच जागतिक आर्थिक वाटचाल नेमकी कशी सुरू आहे, हे देखील पाहणं तितकच गरजेचं आहे. असं परखड मत केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी व्यक्त केलंय.

  • Share this:

30 नोव्हेंबर, नवी दिल्ली : भारतीय अर्थव्यवस्थेत 10 टक्के विकास दराचं उदिष्ठं गाठण्यासाठी 2003-08 सारखी ऊर्जितावस्था येण्याची गरज आहे, एवढंच नाहीतर त्यासाठी देशांतर्गत आर्थिक सुधारणांसोबतच जागतिक आर्थिक वाटचाल नेमकी कशी सुरू आहे, हे देखील पाहणं तितकच गरजेचं आहे. असं परखड मत केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी व्यक्त केलंय. 'एचटी समीट 2017'मध्ये ते बोलत होते. सीएनएन न्यूज18 नेटवर्क या परिषदेचे मीडिया पार्टनर आहे. आज सकाळीच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन झालं.

अर्थमंत्री अरूण जेटली म्हणाले, ''भारतीय अर्थव्यवस्थेला गती प्राप्त करून देण्यासाठी आपल्या देशाला आत्मनिर्भर होण्यासोबतच निर्यातही वाढवावी लागेल. फक्त 5 टक्क्यांपर्यंत जीएसटी लावणारा भारत हा एकमेव देश असून अनेक जीएसटी वसुलीचा दरही आम्ही 28 टक्क्यांपर्यंत खाली आणलाय. भारतात सर्वच वस्तुंना एकसारखा जीएसटी लावणं कदापिही परवडणारं नाही, हवाई चप्पल आणि मर्सिडीज गाडीला आपण कदापिही एकसारखा जीएसटी लावू शकत नाही. त्यामुळे भारतीय व्यापाऱ्यांनी जीएसटीची कररचना समजून घेणं गरजेचं आहे.

 

नोटबंदीसारख्या आर्थिक सुधारणांची राजकीय किंमत मोजायला आम्ही तयार आहोत-पंतप्रधान

पंतप्रधान मोदी म्हणाले, ''नोटबंदीमुळे भ्रष्टाचाऱ्याच्या मनात प्रथमच धडकी भरली असून देशाला एकप्रकारची आर्थिक शिस्तही लागलीय. सरकारने हाती घेतलेल्या आर्थिक सुधारणा या देशवासियांच्या भल्यासाठीच हाती घेतल्याअसूनच भविष्यात त्याचे नक्कीच सकारात्मक परिणाम दिसतील, तसंच आम्ही हाती घेतलेल्या नोटबंदीसारख्या आर्थिक सुधारणांची राजकीय किंमतही मोजायला तयार आहोत. ''

रिलायन्स उद्योग समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही या परिषदेच सहभागी होणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 30, 2017 04:34 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading