S M L

विद्यार्थ्यांनो 'नीट' लक्ष द्या! आता वर्षातून दोन वेळा होणार परीक्षा

यापुढे जीईई मेन्स आणि नीटची परीक्षा आता वर्षातून दोन वेळा होणार आहे. इतकंच नाही तर ५ दिवस या परिक्षा होतील आणि विद्यार्थी आपल्या सोयीनं परिक्षेची तारीख, वेळ ठरवू शकणार आहेत.

Updated On: Jul 7, 2018 05:18 PM IST

विद्यार्थ्यांनो 'नीट' लक्ष द्या! आता वर्षातून दोन वेळा होणार परीक्षा

नवी दिल्ली, ता.7 जुलै: देशातल्या लाखो विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. यापुढे जीईई मेन्स आणि नीटची परीक्षा आता वर्षातून दोन वेळा होणार आहे. इतकंच नाही तर ५ दिवस या परिक्षा होतील आणि विद्यार्थी आपल्या सोयीनं परिक्षेची तारीख, वेळ ठरवू शकणार आहेत. पेपर लिकच्या घटना होऊ नये आणि पारदर्शकता रहावी यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर ही परिक्षा ऑनलाईन घेण्याचा निर्णयही सरकारने घेतलाय.

मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी शनिवारी दिल्लीत पत्रकार परिषदेत या बदलांची माहिती दिली. दरवर्षी सुमारे २६ लाख विद्यार्थी नीट, जेईई मेन्स, सीमॅट, जी मॅटच्या परीक्षा देतात. यातील तब्बल २५ लाख विद्यार्थी जेईई मेन्स आणि नीटची परिक्षा देतात. या परिक्षांचा दर्जा वाढावा यासाठी नॅशनल टेस्टींग एजन्सीने नवे बदल केले आहेत. सीबीएसईच्या ऐवजी आता नॅशनल टेस्टींग सेंटर आता या परिक्षा घेणार आहें. परिक्षांच्या तारखा आणि इतर माहिती लवकरच वेबसाईटवर जाहिर केल्या जाणार आहेत.

कसे आहेत नवे बदल?

कॉम्प्युटर बेस परिक्षा घेताना अभ्यासक्रम, भाषा, प्रश्नावली यात काहीही बदल केला जाणार नाहीये.

केवळ परिक्षेची पध्दत बदलली जाणार आहे..

Loading...
Loading...

वर्षातून दोन वेळा फेब्रुवारी या परिक्षा घेतल्या जातील.

जेईई मेन्स परिक्षा जानेवारी आणि एप्रिलमध्ये होईल

नीट परीक्षा फेब्रुवारी आणि मे महिन्यात होईल.

नेटची परीक्षा डिसेंबरमध्ये होईल.

या दोन्ही परिक्षांचा कालावधी ४ ते ५ दिवस असेल.

विद्यार्थी आपल्या सोयीच्या दिवशी वेळी परीक्षा देऊ शकतो.

काही कारणाने परिक्षेची वेळ हुकली तर पुन्हा संधी असेल

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 7, 2018 05:18 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close