...जेव्हा अभिनंदन यांनी पाकिस्तानात 'हिंदुस्तान जिंदाबाद'च्या घोषणा दिल्या, वाचा संपूर्ण घटनाक्रम

पाकिस्तानी सैन्यानं ताब्यात घेतलेले विंग कमांडर अभिनंदन यांच्याबद्दलचा घटनाक्रम वाचून तुम्हाला देखील अभिमान वाटेल.

News18 Lokmat | Updated On: Mar 1, 2019 06:55 AM IST

...जेव्हा अभिनंदन यांनी पाकिस्तानात 'हिंदुस्तान जिंदाबाद'च्या घोषणा दिल्या, वाचा संपूर्ण घटनाक्रम

मंगळवारी पहाटे 3 वाजून 20 मिनिटांनी भारतीय हवाई दलानं पाकच्या नाकावर टिच्चून पाक व्याप्त काश्मीरमध्ये तब्बल 200 ते 300 दहशतवाद्यांचा खात्मा केला. ओलओसीपासून जवळपास 80 किमी आतमध्ये भारतीय हवाई दल शिरलं होतं. यावेळी पाकिस्तानच्या हवाई दलानं केलेल्या प्रतिकार देखील फिका होता. यावरून भारताची ताकद लक्षात येते.

भारतानं केलेल्या एअर स्ट्राईकनं पाकिस्ताननं भारताला जशास तसे उत्तर देण्याची दर्पोक्ती केली. त्यानंतर बुधवारी सकाळी 8 वाजून 45 मिनिटांनी पाकिस्तानच्या F-16 विमानांनी भारताच्या हद्दीत प्रवेश केला. पण, भारतानं पाकच्या विमानांना भारतीय हवाई दलानं पिटाळून लावलं.

Loading...

मिग - 21 विमानांनी केलेल्या माऱ्यामध्ये पाकिस्तानचं एफ-16 पडलं. पण, याचवेळी मिग -21नं हवेतच पेट घेतला. त्यावेळी विंग कमांडर अभिनंदन यांना पाकिस्ताननं ताब्यात घेतलं. त्यांची चौकशी केली.

हल्ल्या - प्रतिहल्ल्याचा हा खेळ हवेत सुरू होता. सकाळी 8.45 मिनिटांचा हा घटनाक्रम. या मोक्याच्या वेळी अभिनंदन यांच्या विमानातून धूर येऊ लागाला आणि विमानानं पेट घेतला. अखेर अभिनंदन यांनी पॅराशूटच्या साहाय्यानं उडी मारली. पाकिस्तानच्या किल्लान गावातील रझ्झाक हे ग्रामस्थ हवेत रंगलेला हा सारा थरार पाहत होते. त्यांनी याबाबत पाकिस्तानी सैन्याला कळवले.

हल्ल्या - प्रतिहल्ल्याचा हा खेळ हवेत सुरू होता. सकाळी 8 वाजून 45 मिनिटांचा हा घटनाक्रम. या मोक्याच्या वेळी अभिनंदन यांच्या विमानातून धूर येऊ लागाला आणि विमानानं पेट घेतला. अखेर अभिनंदन यांनी पॅराशूटच्या साहाय्यानं उडी मारली. पाकिस्तानच्या किल्लान गावातील रझ्झाक हे ग्रामस्थ हवेत रंगलेला हा सारा थरार पाहत होते. त्यांनी याबाबत पाकिस्तानी सैन्याला कळवले.

यावेळी गावकऱ्यांच्या गराड्यामध्ये असलेल्या अभिनंदन यांनी स्थानिकांना विचारलं हे पाकिस्तान कि हिंदुस्तान? तेवढ्यात गराड्यातील एकानं उत्तर दिलं, हिंदुस्तान! यानंतर मात्र अभिनंदन यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्यांनी थेट हिंदुस्थान झिंदाबादचा नारा द्यायला सुरूवात केली. यावेळी संतापलेल्या पाकिस्तानी नागरिकांनी अभिनंदन यांच्यावर हल्ला केला. मग बचावासाठी अभिनंदन यांनी पिस्तुल काढत हवेत फायरिंग केली. तर गावातील तरूणांनी हातात दगड घेतले.

बचावासाठी अभिनंदन अर्धा किमी पळाले. यावेळी त्यांनी हवेत गोळीबार केला. पळता पळता त्यांनी एका तळ्यात उडी घेत जवळील कागदपत्र गिळून टाकले. त्यानंतर स्थानिकांनी त्यांना मारहाण केली. काही काळानंतर पाकिस्तानी लष्कर दाखल झाले. त्यांनी अभिनंंदन यांना त्याब्यात घेतलं. पण, केवळ नशीब बलवत्तर म्हणून चिडलेल्या तरूणांनी त्यांची हत्या केली नाही, असंही प्रत्यक्षदर्शी रझ्झाक यांनी सांगितलं.

अखेर भारत आणि आंतरराष्ट्रीय समुदायाकडून आलेल्या दबावानंतर पाकिस्तान अखेर विंग कमांडर अभिनंदन याची शुक्रवारी सुटका करणार आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी संसदेत त्यांनी ही घोषणा केली. अभिनंदनच्या सुटकेच्या बदल्यात भारतावर अटी घालण्याचा प्रयत्न पाकिस्तान करत होता. मात्र भारताने पाकिस्तानचे सर्व प्रयत्न धुडकावून लावले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 1, 2019 06:55 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...