मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

'माझ्या तर नाकीनऊ आले आता फडणवीसांकडे 6 जिल्हे', अजितदादांची कोपरखळी

'माझ्या तर नाकीनऊ आले आता फडणवीसांकडे 6 जिल्हे', अजितदादांची कोपरखळी

'राज्य सरकारने पालकमंत्र्यांच्या नेमणुका केल्या चांगलं आहे. पण काही लोकांकडे दोनपेक्षा जास्त जिल्ह्यांची जबाबदारी आहे

'राज्य सरकारने पालकमंत्र्यांच्या नेमणुका केल्या चांगलं आहे. पण काही लोकांकडे दोनपेक्षा जास्त जिल्ह्यांची जबाबदारी आहे

'राज्य सरकारने पालकमंत्र्यांच्या नेमणुका केल्या चांगलं आहे. पण काही लोकांकडे दोनपेक्षा जास्त जिल्ह्यांची जबाबदारी आहे

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Baramati, India

बारामती, 25 सप्टेंबर : 'उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे 6 जिल्ह्यांची जबाबदारी आहे, मी पुण्याचा पालकमंत्री होतो तर नाकीनऊ यायचे, त्यांना ते कसं पेलवणार हे माहिती नाही, पण शुभेच्छा आहे, असं म्हणत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला.

बारामती तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाची 59 वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज पार पडली. या सभेला विरोधी पक्षनेते अजित पवारांनी हजेरी लावली. यावेळी अजित पवारांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं.

शिंदे सरकार तुम्हाला संधी मिळाली आहे कशी मिळाली, गद्दारी केलीय का नाही माहित नाही. पण तुम्ही जनतेची कामे करा, लोकांना आता कामाची अपेक्षा आहे, असा टोला अजितदादांनी शिंदे सरकारला लगावला.

'राज्य सरकारने पालकमंत्र्यांच्या नेमणुका केल्या चांगलं आहे. पण काही लोकांकडे दोनपेक्षा जास्त जिल्ह्यांची जबाबदारी आहे. पालकमंत्र्यांना जिल्ह्याच्या विकासासाठी वेळ द्यावा लागतो. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे 6 जिल्ह्यांची जबाबदारी आहे, मी पुण्याचा पालकमंत्री होतो तर नाकीनऊ यायचे, त्यांना ते कसं पेलवणार हे माहिती नाही, पण शुभेच्छा आहे, असं म्हणत अजितदादांनी फडणवीसांना कोपरखळी लगावली.

(वसुली सम्राटांना जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही, फडणवीसांचा थेट इशारा)

मी पूर्वीच्या काळी शेती करायचो.आता तंत्रज्ञान आलं. पण मजूर नाहीत. अनेक अडचणींना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागतेय कृष्णा-भिमा स्थैर्यीकरण योजनेतून मोठ्या प्रमाणात पाणी साठवणे शक्य होईल. खरेदी विक्री संघात काहीजण गैरव्यवहार करतात. काहींना संचालकांचा हात आहे म्हणून क्लिन चिट दिली जाते. वेगवेगळ्या तक्रारी आहेत. असं चालत असेल तर मला कारवाई करावी लागेल, असा इशाराही अजितदादांनी दिला.

('गेलं सरकार गुर्मीत काम करत होतं', मुख्यमंत्री शिंदेंचा घणाघात)

'कोणत्याही संस्थेच्या अध्यक्ष व कार्यकारी संचालकांनी पारदर्शक माहिती दिलीच पाहिजे. आपली मुलंही ऐकत नाहीत. कामगारांनाही बोलून चालत नाहीत. पण काही संस्थांचे संचालक बैठकीला आल्यानतर कामगारांशी चुकीचं वागतं. चांगली व्यक्ती कशी ओळखावी. एखादा ड्रायव्हर 25/30 वर्षे टिकला असेल तो माणूस चांगला आहे. त्या व्यक्तीची वागणूक चांगली आहे म्हणून तो ड्रायव्हर टिकला. काहींच्या बाबतीत तक्रारी येतात.. अधिकाऱ्यांना नीट बोलत नाहीत. अधिकारी, खातेप्रमुख ही महत्वाची लोकं. मलाही संताप येतो. मीही बोलायला कडक आहे. मी अडीच वर्षे उपमुख्यमंत्री होतो. पण कुणाला कसं बोलायचं हे समजतं. सकाळी सहापासून कामे करतो. अधिकारीही येतात. जिव्हाळा आहे म्हणून अधिकारी येतात. सारखंच आपण चुकीच वागलो तर अधिकारी कसे टिकतील अधिकारी, खातेप्रमुख यांच्याशी नीट वागा, असा सल्लाही अजितदादांनी यावेळी दिला.

First published: