औरंगाबाद 6 डिसेंबर : हिवाळा हा सुगीच्या हंगामाचा ऋतू आहे. या काळात शेतामध्ये वेगवेगळी पिकं आलेली असतात. हिवाळी हवेत भरपूर खाल्लेलं पचतं. त्यामुळे अनेक ठिकाणी फुड फेस्टिव्हलही रंगतात. या फुड फेस्टिव्हलला निरनिराळे पदार्थ खाण्यासाठी खवय्यांची गर्दी होत असते. औरंगाबादमध्ये नुकताच फुड फेस्टिव्हल झाला. या फेस्टिव्हलमध्ये शाही मोघलाई पराठ्याला मोठी मागणी होती. पराठा घरी कसा करायचा ते पाहूया
कसा करणार घरी?
शाही मोघलाई पराठा करण्यासाठी गाजर, शिमला मिरची, फुलकोबी, धने पावडर, गरम मसाला, चाट मसाला, मीठ, पनीर, मैदा, बेकिंग पावडर हे साहित्य लागते.
भेळ खाण्यासाठी लागतात रांगा, अधिकारी वर्गाच्या दुप्पट होते कमाई, Video
हा पराठा बनवताना सगळ्यात पहिल्यांदा तवा गरम करून ठेवा. त्यानंतर तेल टाकावं त्यानंतर गाजर हिरवी मिरची पत्ता गोबी फुलकोबी याचा किस करून तो तव्यावर टाकावा. त्यानंतर त्याला व्यवस्थित भाजून घ्यावं. हे झाल्यानंतर मैद्याचा पीठ घ्यावं त्याला आपण करत असलेल्या पोळीसारखं लाटून घ्यावं. पुरी पोळीच्या साईज मध्ये लाटून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण तयार केलेला मसाला यामध्ये टाकावा. त्यानंतर पोळी चारही बाजूने झाकून घ्यावी. त्यानंतर तव्यावर तेल टाकून त्या तेलामध्ये ही पोळी टाकून तळून घ्यावी.
फुड फेस्टिव्हलमध्ये येणाऱ्या औरंगाबादकरांना काही तरी वेगळं खायला मिळावं म्हणून आम्ही शाही मोगालाई पराठा ही डिश ठेवली होती. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला, असं या स्टॉलच्या प्रमुख पूनम दरक यांनी सांगितलं. तर यापूर्वी आम्ही हा पराठा कधीही खाल्ला नव्हता, आम्हाला हा पराठा खूप आवडल्याची प्रतिक्रिया रोहन भोईटे यांनी दिली.
समोसासोबत राईस आणि झणझणीत तर्री, औरंगाबादची स्पेशल डिश सर्वात भारी!
औरंगाबादमध्ये पार पडलेल्या या फुड फेस्टिव्हलमध्ये 40 पेक्षा जास्त पदार्थांची पर्वणी होती. यामधील अनेक पदार्थ मराठवाड्यात खायला मिळत नाहीत, असं इथं आलेल्या खवय्यांनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aurangabad, Food, Local18, Local18 food