
तुमचा फोन आधीच्या तुलनेत अधिक प्रमाणात बॅटरी वापरत असेल, तर त्याकडे लक्ष देणं आवश्यक आहे. प्रत्येक वेळी बॅटरी खराब झाली असेल म्हणूनच ती लवकर संपत असेल असं नाही. अनेकदा मालवेअर बॅकग्राउंडला सुरू असतात. त्यामुळे बॅटरीचा वापर वाढतो.

फोनचा परफॉर्मन्स अचानक कमी होणं, फोन वारंवार रिस्टार्ट होऊ लागणं, ही सर्व लक्षणं स्मार्टफोन हॅक झाल्याची असू शकतात.

फोन हॅक झाल्यानंतर डेटादेखील अधिक प्रमाणात खर्च होतो. नेहमीच्या तुलनेत डेटा अधिक संपत असल्यास हेदेखील हॅकिंगचं लक्षण असू शकतं. हॅक झालेला फोन मालवेअर सर्व्हरशी कनेक्ट असतो. त्यामुळे स्वत: अपडेट राहण्यासाठी सर्व्हर अधिक डेटा वापरतो.

फोनमध्ये तुम्ही कधीही न इन्स्टॉल केलेले Apps दिसत असतील, अचानक फोनमध्ये पॉपअप अॅड दिसू लागल्या, तर हेदेखील फोन हॅक झाल्याचं कारण असू शकतं.

फोन हॅक झाल्याचं वाटत असल्यास, फोन फॅक्टरी रिसेट करावा. त्याशिवाय ई-मेल पासवर्ड, बॅंकिंग पासवर्ड, इतर सोशल मीडिया पासवर्ड बदलून डेटा बॅकअप घेणं गरजेचं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.