कसा असतो सरन्यायाधीशांचा महाभियोग?

सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीश 65 वर्षांचे होईपर्यंत सरन्यायाधीशच राहतात. त्यांना फक्त महाभियोगाद्वारे पदावरून काढण्यात येता येतं

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Apr 24, 2018 10:56 AM IST

कसा असतो सरन्यायाधीशांचा महाभियोग?

20 एप्रिल:  सुप्रीम कोर्टाच्या  सरन्यायाधीशाच्या महाभियोगाचा  प्रस्ताव आता विरोधक संसदेत आणणार आहे. यावरून प्रचंड गदारोळ होईल. पण नक्की महाभियोग असतो कसा? त्याची प्रक्रिया काय असते हे समजवून घ्यायला हवं. आता 71 खासदार महाभियोग आणण्याच्या तयारीत असून विरोधकांसोबत 7 पक्षांच्या त्याला पाठिंबा आहे.

सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीश 65 वर्षांचे होईपर्यंत सरन्यायाधीशच राहतात.  त्यांना फक्त महाभियोगाद्वारे पदावरून काढण्यात येता येतं. याची तरतूद संविधानाच्या 124(4) कलमात केलेली आहे. त्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे असतो

1.महाभियोगाचा प्रस्ताव लोकसभेच्या 100 किंवा राज्यसभेच्या 50 खासदारांकडून आणला जाऊ शकतो.  सध्या काँग्रेसकडे 71 खासदारांचा पाठिंबा आहे. हा प्रस्ताव राज्यसभेत किंवा लोकसभेत आणला जऊ शकतो.

2.हा प्रस्ताव सभागृहाच्या अध्यक्ष किंवा सभापतींकडून स्विकारला किंवा नाकारला जाऊ शकतो. जर स्विकारला गेला तर तीन न्यायाधीशांची एक समिती   तयार केली जाते. ज्यात एक सुप्रीम कोर्टाचा वरिष्ठ न्यायाधीश असतो ,एक हायकोर्टाचा न्यायाधीश तर एक कायदेअभ्यासक असतो. हे तिघंही सरन्यायाधीशाविरूद्धच्या  आरोपांची शहानिशा,तपासणी करतात.

3.जर या समितीने महाभियोगाच्या प्रस्तावास मंजूरी दिली तर मग  हा प्रस्ताव लोकसभेत चर्चेसाठी मांडण्यात येतो. या प्रस्तावाला मंजूरी देण्यासाठी सभागृहातील दोन तृतीयांश  सदस्यांनी मान्यता द्यावी लागते. त्यासाठी मतदानही घेण्यात येतं.

4. लोकसभेने मंजूर झाल्यास हा प्रस्ताव राज्यसभेत येतो. राज्यसभेतही तितक्याच बहुमताने तो मंजूर करावा लागतो. राज्यसभेत तो मंजूर झाल्यास  हा प्रस्ताव राष्ट्रपतींकडे जातो. राष्ट्रपतींनी या प्रस्तावावर   सही केल्यानंतर मग सरन्यायाधीशांना पदावरून काढून टाकण्यात येते.

आता दिपक मिश्रांचं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठऱणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 20, 2018 04:08 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close