Lockdown च्या अर्थसंकटाचा कसा सामना करणार? राहुल गांधींनी घेतली रघुराम राजन यांची मुलाखत

Lockdown च्या अर्थसंकटाचा कसा सामना करणार? राहुल गांधींनी घेतली रघुराम राजन यांची मुलाखत

अशा प्रकारे राहुल प्रथमच मुलाखतकाराच्या भूमिकेत दिसणार आहेत. ही मुलाखत उद्या प्रदर्शित होणार आहे

  • Share this:

मुंबई, 29 एप्रिल : देशभरात कोरोनाचा (Coronavirus) कहर वाढत आहे. परिणामी लॉकडाऊन वाढण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. महिनाभराहून अधिक काळ लॉकडाऊनमध्ये सुरू असून अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त सर्व सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत. यामुळे छोट्यांपासून मोठे कारखाने बंद आहेत. अशा परिस्थिती मजुरांच्या हाताला काम नसल्याने त्यांना संकटाचा सामना करावा लागत आहे.

लॉकडाऊन आणि कोरोनामुळे फक्त भारतच नाही संपूर्ण जगावर परिणाम झाला आहे. लॉकडाऊनच्या काळात सर्व काम बंद असल्याने भविष्यात अर्थव्यवस्थेवर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता विविध तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे. सध्या जगासमोर अर्थव्यवस्थेला पुन्हा सुधारण्याचं मोठं आव्हान आहे.

त्यातच कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ आणि माजी गव्हर्नर रघुराम राजन (Raghuram Rajan) यांची मुलाखत घेतली आहे. यावेळी त्यांनी अर्थव्यवस्थेच्या संकटाविषयी विविध प्रश्न उपस्थित केले आणि रघुराम राजन यांनी त्याची उत्तर दिली. यातील अनेक उत्तरं ही धक्कादायक असणार आहेत. मात्र येत्या काळात अर्थव्यवस्था रुळावर आणणं हे मोठं आव्हान असणार आहे.

उद्या @INCIndia आणि कॉंग्रेसच्या इतर सोशल मीडिया हॅंडलवर ही मुलाखत प्रसिद्ध होणार आहे. याबाबत कॉंग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी ट्विट केलं आहे.

संबंधित - अमेयने मराठीत वाचलं इरफानचं ‘ते’ पत्र, VIDEO पाहून तुमच्याही डोळ्यात येतील अश्रू

First published: April 29, 2020, 10:33 PM IST

ताज्या बातम्या