Credit Card घेताय? त्याआधी जाणून घ्या बंद करण्याची अवघड प्रक्रिया

Credit Card घेताय? त्याआधी जाणून घ्या बंद करण्याची अवघड प्रक्रिया

डिजिटल पेमेंटची (Digital Payment) सुविधा उपलब्ध झाल्यापासून बहुसंख्य लोक रोख रकमेऐवजी (Cash) डेबिट कार्ड(Debit card), क्रेडीट कार्डद्वारे(Credit Card) किंवा मोबाइलवरून (Mobile)आर्थिक व्यवहार करतात.

  • Share this:

मुंबई, 12 मे : डिजिटल पेमेंटची (Digital Payment) सुविधा उपलब्ध झाल्यापासून बहुसंख्य लोक रोख रकमेऐवजी (Cash) डेबिट कार्ड(Debit card), क्रेडीट कार्डद्वारे(Credit Card) किंवा मोबाइलवरून (Mobile)आर्थिक व्यवहार करतात. मोबाइलवरून पेमेंट केलं जातं तेव्हा ज्या सेवेद्वारे आपण पेमेंट करतो त्या कंपनीच्या अॅपशी(App) आपले बँक खाते (Bank Account) जोडलेले असते किंवा मोबाइल वॉलेटमध्ये पैसे जमा केलेले असतात. त्यातून थेट पैसे दिले जातात. त्यामुळे त्या बँक खात्यात पैसे असतील तरच आपल्याला व्यवहार करता येतो; पण खरेदी केल्यानंतर काही दिवसांनी पैसे भरण्याची सुविधा देणारा एक पर्याय बँका देतात, तो म्हणजे क्रेडिट कार्डचा(Credit Card).

क्रेडिट कार्डद्वारे तुम्हाला दिलेल्या मर्यादेपर्यंत तुम्ही कितीही खरेदी करू शकता. त्याचे पैसे लगेच खात्यातून वजा होत नाहीत, तर ते ठराविक कालावधीनंतर तुम्हाला भरावे लागतात. त्यामुळे बँक खात्यात पैसे नसतानाही खरेदी करण्याचं स्वातंत्र्य क्रेडीट कार्डमुळे मिळतं. म्हणून अनेक लोकांना त्याची भुरळ पडते.

बँका हे क्रेडिट कार्ड घेण्याचा ग्राहकांना सतत आग्रह करत असतात. अनेक ठिकाणी बँकेकडून क्रेडिट कार्ड घेण्याची ऑफर देणारे लोक आपल्याला भेटतात. अनेकदा यासाठी बँकेकडून फोन येत असतात. क्रेडिट कार्ड घेण्यासाठी विविध आकर्षक सवलतींचे आमिष दाखवले जाते. त्यामुळे अनेक लोक क्रेडिट कार्ड घेतात,काही लोकांकडे तर एक-दोन नव्हे तर 5-6 क्रेडिट कार्डसदेखील असतात. कालांतरानं काही कारणांनी कार्डची गरज भासेनाशी झाली किंवा ते वापरणं जमेनासे झालं की, बंद करण्याचा निर्णय घेतला जातो आणि मग खरी कसोटी लागते. क्रेडिट कार्ड बंद करणं (Closing Credit Card) ही फार मोठी आणि किचकट प्रक्रिया आहे.

क्रेडिट कार्ड वापरणं थांबवलं की ते बंद होईल, असा अनेकांचा समज आहे, पण तसे नाही. बँकेनं निश्चित केलेली प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय क्रेडिट कार्ड बंद होत नाही. क्रेडिट कार्ड बंद करण्यासाठी खालील प्रक्रिया पूर्ण करणं आवश्यक आहे.

सगळं शिल्लकबिल भरावं लागेल:

क्रेडिट कार्ड बंद करायचे असेल तर सर्वात आधी काही बिल भरायचे शिल्लक असल्यास ते भरावं लागेल. त्याचबरोबर वार्षिक शुल्क देखील (Annual Fee)द्यावं लागेल. बँकेच्या सिस्टममधून तुमचं क्रेडिट डी-अॅक्टीव्हेट(De-Activate) केलं गेलं नाही, तर तुमचं वार्षिक शुल्क वाढतच जाईल. त्यामुळे आधी संपूर्ण थकबाकी भरा आणि त्यानंतरच क्रेडिट कार्ड बंद होण्याच्या प्रकियेला सुरुवात करावी.

क्रेडिट कार्ड बंद करण्यासाठी अर्ज करा :

क्रेडिट कार्ड अधिकृतपणे बंद होण्यासाठी तुम्हाला बँकेकडे अर्ज (Application) करावा लागेल. हेऑनलाइनदेखील करता येते. बर्‍याच बँकांमध्ये आपण क्रेडिट कार्ड बंद करण्यासाठी अर्ज करता तेव्हा काही बिलं भरायची शिल्लक असल्यास बँक त्याकरता एक लिंक पाठवते. त्यावरून बिल भरल्यानंतर तुमचा अर्ज पुढं पाठवला जातो. कस्टमर केअर विभागाला (Customer Care) कार्ड बंद करण्याबाबत सांगून काही होत नाही. ठरलेली प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय क्रेडिट कार्ड बंद केले जात नाही, हे लक्षात घ्या. कार्ड बंद करण्याचा अर्ज दिल्यानंतर त्याबाबत बँकेकडून जोपर्यंत कार्ड बंद केल्याचा संदेश येत नाही, तोपर्यंत कार्ड बंद झाले असं गृहीत धरू नका. याबाबत बँकेत सतत चौकशी करावी. बँकेकडून कार्ड बंद झाल्याची निश्चिती झाल्यावर तुमच्याकडे असलेल्या क्रेडिट कार्डचे तुकडे करा आणि फेकून द्या. क्रेडिट कार्ड खरंच बंद झालं आहे की नाही,याची खात्री करण्यासाठी काही महिन्यांनी तुमच्या क्रेडिट कार्डचा रिपोर्ट तपासा आणि खात्री करून घ्या. क्रेडिट कार्ड बंद करण्याची ही प्रक्रिया जाणून घेतल्यानंतर पूर्ण विचारांती क्रेडिट कार्ड घेण्याचा निर्णय घ्या.

First published: May 12, 2021, 7:44 AM IST

ताज्या बातम्या