मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /कोरोना काळात मुलांची रोगप्रतिकारशक्ती कशी वाढवाल?; वाचा हे सोपे उपाय

कोरोना काळात मुलांची रोगप्रतिकारशक्ती कशी वाढवाल?; वाचा हे सोपे उपाय

आजच्‍या युगात मुलाची रोगप्रतिकारशक्‍ती वाढवण्‍यासोबत त्‍याचे संसर्गांपासून कशाप्रकारे संरक्षण करता येईल?

आजच्‍या युगात मुलाची रोगप्रतिकारशक्‍ती वाढवण्‍यासोबत त्‍याचे संसर्गांपासून कशाप्रकारे संरक्षण करता येईल?

आजच्‍या युगात मुलाची रोगप्रतिकारशक्‍ती वाढवण्‍यासोबत त्‍याचे संसर्गांपासून कशाप्रकारे संरक्षण करता येईल?

मुंबई 19 मार्च: मुलांना, विशेषत: तान्‍ह्या मुलांना वर्षभरात विविध आजार व संसर्ग होण्‍याची दाट शक्‍यता असते. म्‍हणून पालकांनी मातेकडून मुलाकडे रोगप्रतिकारशक्‍ती कशाप्रकारे हस्‍तांतरित होऊ शकते आणि वाढीच्‍या काळादरम्‍यान मुलाची रोगप्रतिकारशक्‍ती वाढवण्‍याचे महत्त्व समजून घेणे आवश्यक आहे. पेशींचे संरक्षण करणा-या अ‍ॅण्‍टीबॉडीज प्रसूती काळादरम्‍यान नाळेच्‍या माध्‍यमातून मातेकडून बाळाकडे हस्‍तांरित होतात. यामुळे बाळाचे जन्‍मानंतरच्‍या सुरूवातीच्‍या दिवसांदरम्‍यान संरक्षण होण्‍यामध्‍ये मदत होते. (How to boost immune system)

मुलाची रोगप्रतिकारशक्‍ती कशाप्रकारे वाढवता येऊ शकते?

मुलांना दीर्घकाळापर्यंत आरोग्‍यदायी ठेवण्‍यासाठी पालकांनी सतत त्‍यांच्‍या रोगप्रतिकारशक्‍तीची तपासणी करणे अत्‍यंत महत्त्वाचे आहे.

स्‍तनपान: स्‍तनपान हा वाढीदरम्‍यान बाळाची रोगप्रतिकारशक्‍ती वाढवण्‍याला मदत करण्‍याचा सर्वोत्तम मार्ग आहे. मातेच्‍या दूधामध्‍ये बाळाची रोगप्रतिकारशक्‍ती वाढवण्‍यासाठी महत्त्वपूर्ण घटक असतात, जसे प्रथिने, मेद, शर्करा, अ‍ॅण्‍टीबॉडीज व प्रोबायोटिक्‍स. मातेमधील अ‍ॅण्‍टीबॉडीज स्‍तनाच्‍या दूधामधून देखील बाळामध्‍ये हस्‍तांतरित होतात.

लसीकरण: प्रमाणित मार्गदर्शकतत्त्वांनुसार लसीकरण उपक्रमामध्‍ये बाळाची नोंदणी करणे हा त्‍यांचे गंभीर आजारांपासून संरक्षण करण्‍याचा प्रभावी व सुरक्षित उपाय आहे.

योग्‍य स्‍वच्‍छता: तुमच्‍या मुलांना जमिनीवरील बाह्य वस्‍तूंना स्‍पर्श करण्‍यापासून नियंत्रित करा, कारण त्‍यामुळे घातक संसर्ग संक्रमित होऊ शकतात. त्‍यांना वारंवार, विशेषत: जेवणापूर्वी व जेवणानंतर हात स्‍वच्‍छ धुण्‍याची सवय लावा.

पुरेशी झोप: योग्‍य झोप मिळाल्‍याने तुमच्‍या मुलाची रोगप्रतिकारशक्‍ती वाढवण्‍यामध्‍ये मदत होईल. अपु-या झोपेमुळे संसर्गाचा सामना करण्‍यामध्‍ये मदत करणारे आणि दाह कमी करणारी सायटोकाइन्‍स नावाची प्रथिने निर्माण करण्‍याची शरीराची क्षमता कमी होते. मुलांनी दिवसातून किमान ८ ते १० तास झोप घ्‍यावी.

एस्‍कॉर्बिक अ‍ॅसिड म्‍हणून ओळखले जाणारे जीवनसत्त्व क लिंबूवर्गीय फळे, बेरी, बटाटे व मिरपूडमध्‍ये आढळून येते. तसेच जीवनसत्त्व क टोमॅटो, मिरपूड व ब्रोकोली अशा वनस्‍पती स्रोतांमधून देखील आढळून येते. जीवनसत्त्व क अ‍ॅण्‍टीबॉडीज तयार होण्‍याला चालना देत रोगप्रतिकारशक्‍तीला साह्य करते.

जीवनसत्त्व ई अ‍ॅण्‍टीऑक्सिडण्‍ट म्‍हणून कार्य करते आणि रोगप्रतिकारशक्‍तीला साह्य करू शकते. तसेच फोर्टिफाईड सेरेअल्‍स, सुर्यफूल बिया, बदाम, तेल (जसे सनफ्लॉवर किंवा सॅफ्लॉवर तेल), हेझल नट्स व पीनट बटरसह मुलाच्‍या आहारामध्‍ये जीवनसत्त्व ई ची भर केल्‍यास रोगप्रतिकारशक्‍ती वाढण्‍याला मदत होईल.

झिंक रोगप्रतिकारशक्‍तीला कार्यक्षमपणे मदत करते आणि जखमांवरील उपचारामध्‍ये मदत करू शकते. तुमच्‍या मुलासाठी झिंकचे स्रोत आहेत मांस, चिकन, सीफूड, दूध, कडधान्‍ये, सोयाबीन, बियाणे व नट्स.

प्रथिने हे तुमच्‍या मुलाच्‍या रोगप्रतिकारशक्‍तीचे, विशेषत: उपचार व आजारातून लवकर बरे होण्‍याचे आधारस्‍तंभ आहेत. सीफूड, मांस, चिकन, अंडी, सोयाबीन व वाटाणे, सोया उत्‍पादने आणि अनसॉल्‍टेड नट्स व बियाणे सारख्‍या प्रथिने संपन्‍न खाद्यपदार्थांमुळे रोगप्रतिकारशक्‍ती वाढवण्‍याला मदत होईल.

प्रोबायोटिक्‍स हे जीवित सूक्ष्‍मजीव आहेत, जे नैसर्गिकरित्‍या दही, किमची, सॉकरक्रॉट, मिसो आणि केफिर यांसारख्‍या पदार्थांमध्‍ये आढळून येतात. हे सूक्ष्‍मजीव 'उत्तम' किंवा 'अनुकूल' जीवाणू म्‍हणून ओळखले जातात. ते घातक जीवाणूंना दूर करतात आणि आतड्यांमध्‍ये राहण्‍याला प्रतिबंध करतात.

इतर पौष्टिक घटक जीवनसत्त्व अ, ड, ब६, ब१२, कॉपर, फोलेट, सेलेनियम व लोह देखील तुमच्‍या मुलाची रोगप्रतिकारशक्‍ती वाढवण्‍याला मदत करतात.

(अ‍ॅड्रॉइट बायोमेड लि. येथील स्‍ट्रॅटेजिक मेडिकल अफेअर्स प्रमुख डॉ. अनिश देसाई (एमडी, एफसीपी, पीजीडीएचईपी) आणि अ‍ॅड्रॉइट बायोमेड लि. येथील मेडिकल अफेअर्स एक्झिक्‍युटिव्‍ह डॉ. सुनैना आनंद (फार्मा डी) यांनी हे उपाय सुचवले आहेत.)

First published:

Tags: Health, Health Tips