तुमच्या स्मार्टफोन्सवरून Block करा नको असलेले कॉन्टॅक्ट नंबर; 'या' आहेत स्टेप्स

तुमच्या स्मार्टफोन्सवरून Block करा नको असलेले कॉन्टॅक्ट नंबर; 'या' आहेत स्टेप्स

प्रत्येक स्मार्टफोनमध्ये नको असलेले नंबर ब्लॉक करण्याची वेगवेगळी पद्धत असते

  • Share this:

मुंबई, 10 मे : मोबाइल जवळ नसेल तर अनेकांना चैन पडत नाही, पण तोच मोबाइल अनेकदा त्रासदायकसुद्धा ठरतो. महत्त्वाची मिटींग सुरू असताना किंवा तुम्ही निवांत आराम करताना अचानक फोन वाजतो आणि महत्त्वाचा कॉल म्हणून तुम्ही तो रिसिव्ह करता. मात्र, तो कॉल एखाद्या क्रेडिट कार्ड, बँकिंग सर्विस किंवा इन्शुरन्स कंपनीकडून आलेला आहे हे जेव्हा तुम्हाला कळते तेव्हा तुमचा राग अनावर झालेला असतो. आपल्या सर्वांच्याच मोबाइलमध्ये असे प्रमोशनल मॅसेजसुद्धा येतात ज्यामुळे इनबॉक्स फुल होऊन जातो. असे नको असलेले नंबर ब्लॉक करण्याची प्रत्येक स्मार्टफोनमध्ये वेगवेगळी पद्धत असते. नको असलेल्या नंबर किंवा मॅसेजपासून सुटका करून घेण्यासाठी आज आम्ही तुम्हाला चार वेगवेगळ्या फोनमध्ये वापरल्या जाणाऱ्या सोप्या स्टेप्स सांगणार आहोत.

इथे मिळतेय iPhone वर 22 हजार रुपयांची भारी सूट; अशी आहेत फिचर्स आणि किंमत

Samsung - तुमच्याजवळ सॅसमंगचा स्मार्टफोन असेल आणि एखादा नंबर तुम्लाहा ब्लॉक करायचा असले तर सगळ्यात पहिले तुम्हाला डायलर अॅप ओपन करावं लागेल. त्यानंतर जो नंबर तुम्हाला ब्लॉक करायचा आहे तो सिलेक्ट करा. त्यानंतर ब्लॉक कॉन्टॅक्टवर क्लिक करा. असं केल्याने तो नंबर ब्लॉक होतो.

Xiaomi - जर Xiaomiचा स्मार्टफोनमध्ये तुम्हाला कोणता नंबर ब्लॉक करायचा असेल तर सगळ्यात पहिले सिक्युरिटी अॅप ओपन करा. त्यानंतर ब्लॉकलिस्ट ऑप्शन सिलेक्ट करा. याठिकाणी जो नंबर तुम्हाला ब्लॉक करायचा असेल तो टाका. असं केल्याने तुम्ही टाकलेल नंबर ब्लॉक होतो.

TATA लवकरच लाँच करणार नवी SUV Blackbird; 'ही' आहेत फीचर्स आणिक किंमत

Oppo - या कंपनीत्या स्मार्टफोनमध्ये एखादा नंबर ब्लॉक करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिले सेटिंग्स अॅप ओपन करावं लागेल. त्यानंतर कॉल्स आणि नंतर ब्लॉक लिस्ट ऑप्शन सिलेक्ट करा. त्यात तुम्ही जो नंबर टाकाल तो ब्लॉक होईल.

Huawei - या कंपनीचा मोबाइल जर तुमच्याजवळ असेल तर सगळ्यात पहिले कॉन्टॅक्ट्समध्ये जाऊन जो नंबर तुम्हाला ब्लॉक करायचा आहे तो सिलेक्ट करा. त्यानंतर दिसणाऱ्या थ्री डॉट्सवर टॅप करा. यामध्ये तुम्हाला तो नंबर ब्लॉक करायचं ऑप्शन मिळेल.

First published: May 10, 2019, 3:56 PM IST
Tags: block

ताज्या बातम्या