नवी दिल्ली, 12 नोव्हेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी आज रिटेल डायरेक्ट योजना (Retail Direct Scheme) आणि एकात्मिक लोकपाल योजना (Integrated Ombudsman Scheme) सुरू केली आहे. आरबीआयच्या रिटेल डायरेक्ट योजनेमुळे सरकारी सिक्युरिटीजमध्ये किरकोळ सहभाग वाढेल, तर एकात्मिक लोकपाल योजनेचा उद्देश तक्रार निवारण प्रणालीमध्ये आणखी सुधारणा करणं आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले, "आज सुरू झालेल्या दोन योजनांमुळे देशातील गुंतवणुकीची व्याप्ती वाढेल आणि गुंतवणूकदारांसाठी भांडवली बाजारात प्रवेश सुलभ, अधिक सोयीस्कर होईल." भारतातील सर्व सरकारी सिक्युरिटीजना सुरक्षेची हमी असते, त्यामुळे लहान गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणुकीवर सुरक्षिततेची खात्री दिली जाईल.
हे वाचा - कंगनाचे विधान चुकीचेच पण मोदी सरकारविषयी तिचे वक्तव्य बरोबर -चंद्रकांत पाटील
बँकिंग ग्राहकांना दिलासा
एकात्मिक लोकपाल योजनेअंतर्गत बँकिंग ग्राहकांच्या तक्रारी सोडवता येणार आहेत. RBI द्वारे नियमन केल्या जात असलेल्या संस्थांच्या कामजावर आक्षेप असेल तर ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी एक उत्तम प्रणाली निर्माण केली जाणार आहे. ही योजना 'वन नेशन-वन ओम्बड्समन'वर आधारित आहे. यामध्ये ग्राहकांना तक्रारी करण्यासाठी एक पोर्टल, एक ईमेल आणि एक पत्ता अशी सुविधा देण्यात आली आहे. तक्रारदारांना त्यांच्या तक्रारी नोंदवण्यासाठी, कागदपत्रे सादर करण्यासाठी आणि अभिप्राय देण्यासाठी स्पेस मिळेल. तक्रारी सोडवण्यासाठी आणि तक्रारी नोंदवण्यासाठी अनेक भाषांमध्ये एक टोल फ्री नंबर देखील असणार आहे. त्यामुळे बँकिंग सेवा आता सरकारी बाबूंना अधिक चांगली द्यावी लागेल.
हे वाचा - हिवाळ्यात फक्त एक डाळिंब खाण्याचे आहेत भरपूर फायदे; वजनासह कोलेस्ट्रॉलही होईल कमी
गिल्ट खाते बचत खात्याशी जोडले जाईल
सरकारी रोख्यांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी निधी व्यवस्थापकांची गरज भासणार नाही. गुंतवणूकदार थेट गिल्ट खाते उघडू शकतात. हे खाते बचत खात्याशीही जोडले जाईल. लोकांना याचा किती फायदा होईल याची तुम्ही कल्पना करू शकता, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.