बीड, 10 ऑक्टोबर : धनंजय मुंडे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे फायरब्रँड नेते मानले जातात. त्यांची वक्तृत्त्वशैली संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहेत. मात्र, त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसपक्षात प्रवेश कसा झाला, याबाबत स्वत: त्यांनीच भाष्य केले आहे. ते बीडच्या गेवराईमध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत आयोजित, माजी मंत्री शिवाजीदादा पंडित यांच्या 85 व्या अभिष्ठचिंतन सोहळ्यानिमित्त कार्यक्रमात बोलत होते.
काय म्हणाले धनंजय मुंडे -
"मी जेव्हा भाजपमध्ये होतो, तेव्हा मी भैय्यासाहेबांना (अमरसिंह पंडितांना) चकली देऊन भाजपमध्ये नेले आणि ते आमदार झाले. त्यानंतर भैय्यासाहेबांनी (अमरसिंह पंडितांनी) मला चकली देऊन राष्ट्रवादीत आणलं आणि मी आमदार झालो", असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी भाजप-राष्ट्रवादीत येण्या जाण्याचा किस्सा सांगितला. तर यावेळी त्यांनी मंत्री रावसाहेब दानवे, विरोधीपक्षनेते अंबादास दानवे आणि मंत्री संदीपान भूमरे यांच्यावर मिस्कील टोला लगावला.
हेही वाचा - Sanjay raut : संजय राऊतांना जामीन नाहीच! पुढील सुनावणी 17 ऑक्टोबरला
ते पुढे म्हणाले की, दादांचे एक स्वप्न अधुरे आहे, ते आपण विजयराजेंना 2024 च्या निवडणुकीत निवडून देऊन पूर्ण करू. तेव्हाच खऱ्या अर्थाने दादांच्या अभिष्ठचिंतन सोहळ्याच्या शुभेच्छा ठरतील, असे आवाहन देखील यावेळी धनंजय मुंडे यांनी केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Beed news, Dhananjay munde, NCP