दोघांचं भांडण, तिसऱ्याचा लाभ, घराण्यांतल्या तंट्यांचा भाजपला होणार फायदा

दोघांचं  भांडण, तिसऱ्याचा लाभ, घराण्यांतल्या तंट्यांचा भाजपला होणार फायदा

देशातल्या राजकारणात जशी घराणेशाही वाढीला लागलीय तसंच घराण्यांमधे कलहही वाढलेत. या भांडणांचा फायदा मात्र भाजपला होणार आहे.

  • Share this:

देशातल्या राजकारणात जशी घराणेशाही वाढीला लागलीय तसंच घराण्यांमधे कलहही वाढलेत. दक्षिणेतून उत्तरेत नजर टाकली तर करुणानिधी यांच्या कुटुंबापासून ते महाराष्ट्रात ठाकरे परिवार आणि उत्तर प्रदेशमध्ये मुलायंसिंह यादव यांच्यापासून ते बिहारमधल्या लालूप्रसाद यादव यांच्यापर्यंत सगळीकडे घराणेशाही आणि घराण्यातले कलह समोर येताना दिसतायत. या भांडणांचा फायदा मात्र भाजपला होणार आहे.

तामिळनाडू

दक्षिण भारतात करुणानिधी यांच्या कुटुंबातली भांडणं अजूनही कायम आहेत. एम. के. अळागिरी आणि एम. के. स्टॅलिन यांच्यामधलं भांडणं करुणानिधी जिवंत असतानाच सुरू झालं होतं. आता पार्टीची सूत्रं स्टॅलिन यांच्याकडे आल्याने एम. के. अळागिरी काहिसे बाजूला पडलेत. ते या निवडणुकीत कुणासोबत जाणार याचा निर्णय त्यांनी घेतलेला नाही. पण ते भाजपच्या बाजूने असल्याच्या बातम्या येतायत. करुणानिधी यांच्यातल्या संघर्षाचा जयललिता यांच्या अण्माद्रमुक पक्षाला मिळतोय आणि अण्णाद्रमुक भाजपसोबतच आहे. त्यातच अळागिरींनी जर भाजपला पाठिंबा जाहीर केला तर हा फायदा अजून दुप्पट होऊ शकतो.

उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेशमधला सगळ्यात सामर्थ्यवान पक्ष असलेल्या मुलायमसिंह यादव यांच्या पक्षातली भांडणं विधानसभा निवडणुकांपासूनच सुरू झाली होती. हा वाद शमण्याची चिन्हं नाहीत. सिवपाल यादव यांनी समाजवादी पक्षातून बाहेर पडून नवा पक्ष स्थापन केला आहे. पण या कुटुंबाचे प्रमुख मुलायमसिंह यादव हे त्यांचा नातू तेज प्रताप यांचं अस्तित्व वाचवण्याची धडपड करतायत.

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या उमेदवारीवर अजूनही कोणताही निर्णय झालेला नाही. मुलायमसिंह यादव यांनी त्यांचा नातू तेजप्रताप यादव यांच्यासाठी आझमगडची जागा मिळवण्याची मोर्चेबांधणी केलीय. याचाही फायदा भाजपला होतोय. ज्या यादव व्होटबँकवर अखिलेश याद भाजपला आव्हान देतायत त्या यादवांची मतं फुटण्याची शक्यता आहे. इटावा आणि जवळच्या भागात शिवपाल यादव यांचा प्रभाव आहे. त्यांनी समाजवादी पक्षाची पारंपरिक मतं फोडली तर त्याचाही फायदा भाजपलाच मिळेल.

बिहार

बिहारमध्ये लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबातले तंटे आधीच चव्हाट्यावर आलेत. निवडणुकीच्य 3 महिने आधीच तेजप्रताप यादव घराच्या बाहेर पडले त्याचा परिणाम तिकीटवाटप आणि पक्षाच्या ऐक्यावर होणार आहे. तेज प्रताप यांच्या पक्ष सोडण्यामुळे पक्षातले नेते एकमेकांवर आरोप करतायत. बिहारमध्ये एनडीए विरुद्ध यूपीए असा थेट मुकाबला आहे. यूपीएमधला प्रमुख घटक पक्ष राष्ट्रीय जनता दलामध्ये असे वाद असतील तर त्याचा फायदाही एनडीएला होणार आहे.

महाराष्ट्र

महाराष्ट्रात सगळ्यात दबदबा असलेलं पवार कुटुंबीय. पवार कुटुंबीयांमधला संघर्ष सध्या बातम्यांमध्ये येत असतो. या बातम्यांनुसार, अजित पवार त्यांचा मुलगा पार्थला उमेदवारी द्यायची होती. त्यामुळे शरद पवारांना माढामधून माघार घ्यावी लागली.

दुसरीकडे ठाकरे कुटुंबात तर आधीपासूनच भांडणतंटे आहेत. उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसेनेची सूत्रं दिल्यानंतर राज ठाकरेंनी नवा पक्ष काढला. या लोकसभा निवडणुकीत मनसेने न लढण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मतविभागणी हणार नाही, यामुळे भाजपला फायदा मिळेल.

Tags: BJP
First Published: Mar 21, 2019 04:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading