राजकारणाच्या खेळपट्टीवर काही क्रिकेटपटूंचा सिक्सर तर काही थेट बाद !

राजकारणाच्या खेळपट्टीवर काही क्रिकेटपटूंचा सिक्सर तर काही थेट बाद !

क्रिकेटचे मैदान गाजवणारे क्रिकेटर निवृत्तीनंतर कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात शिरकाव करतात. त्यातले बरेचजण राजकारणाच्या मैदानात उतरतात.

  • Share this:

नवी दिल्ली, 21 मे : लोकसभा निवडणुकीच्या मतदानानंतर सध्या सर्वत्र चर्चा आहे ती एक्झिट पोलची.एक्झिट पोलच्या आकड्यांनुसार 'अब की बार, मोदी सरकार'चं येणार असे संकेत दिसले असले तरी सध्या दिल्लीत सरकार स्थापन करण्याच्या दृष्टीने हलचाली सुरु झाल्या आहेत. निवडणुकीचा निकाल 23 मे रोजी लागणार असला तरी त्याआधी दिल्लीत राजकीय वातावरण तापले आहे. दरम्यान यंदाच्या निवडणुकीत आकर्षणाचे विषय ठरले ते, अभिनेत्री, अभिनेते आणि क्रिकेटपटू.

क्रिकेटचे मैदान गाजवणारे क्रिकेटर निवृत्तीनंतर कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात शिरकाव करतात. त्यातले बरेचजण राजकारणाच्या मैदानात उतरतात. 2019च्या लोकसभा निवडणुकीतही भारताचा माजी खेळाडू गौमत गंभीरनं राजकारणात प्रवेश केला. भाजपमध्ये पक्ष प्रवेश केल्यानंतर पुर्व दिल्लीतून गंभीरला उमेदवाराही देण्यात आली. गंभीरनं 2007 टी-20 वर्ल्ड कप आणि 2011 वर्ल्ड कपमध्ये महत्त्वाची भुमिका बजावली होती. मात्र क्रिकेटच्या मैदानातून थेट राजकारणात प्रवेश करणारा गंभीर हा काही पहिला खेळाडू नाही. तर, सगळ्यात आधी 1933-34च्या निवडणुकीत पहिल्यांदा एका क्रिकेटपटूनं राजकारणाच्या मैदानात प्रवेश केला होता. इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी आपल्या पुस्तकात केलेल्या नोंदीनुसार, पलवानकर बबलू हे पहिले क्रिकेटपटू होते, ज्यांनी राजकारणात प्रवेश केला होता. दलित नेता म्हणून ओळख असलेले बबलू मुंबईच्या पालिका निवडणुकीत लढले होते. मात्र त्यांना पारसी डॉक्टर होमी पर्वी यांच्याकडून पराभव स्विकारावा लागला होता.

एवढेच नाही तर, 193मध्ये कॉंग्रेसकडून मैदानातून ते थेट उतरले ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात. त्यांनी बाबासाहेबांना चांगलीच लढत दिली होती. बाबासाहेबांविरोधात त्यांना केवळ 2000 मतांनी पराभव स्विकारावा लागला होता. त्यानंतर त्यांनी कोणतीही निवडणुक लढली नाही. दरम्यान त्यांनतर भारताच्या स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा जर कोणी क्रिकेटर राजकारणाच्या मैदानात उतरला असेल तर ते आहेत. नवाब मन्सुर अली खान पतौडी. भारताचे महान फलंदाज आणि पहिले कर्णधार शुमार मंसूर अली खान पतौडी यांनी दोनवेळा लोकसभा लढवली. सुरुवातीला विशाल हरयाणा पक्षानं 1971साली गुडगावमधून निवडणुक लढवली. त्यानंतर कॉंग्रेसनं टायगर पतौडी यांना 1991मध्ये भोपाळमध्ये उतरवलं. मात्र दोन्ही ठिकाणी त्यांना पराभव स्विकारावा लागला.

क्रिकेटपटूंना संधी देण्यात भाजप आघाडीवर

दलित उमेदवार आणि नवाब यांच्यानंतर अनेक क्रिकेटपटूंनी राजकारणात प्रवेश केला. मात्र त्यांना हवे तसे यश मिळाले नाही. दरम्यान यात भाजपनं सगळ्यात जास्त क्रिकेटपटूंनी राजकारणात संधी दिली आहे. नवज्योत सिंग सिद्धू (जे सध्या कॉंग्रेसमध्ये आहे), चेतन चौहान, किर्ती आझाद आणि आता गौतम गंभीर अश्या चार क्रिकेटपटूंना आतापर्यंत संधी दिली आहे. सिद्धू पहिल्यांदा भाजपकडून 2004मध्ये अमृतसरमधून खासदारकी मिळाली. त्यानंतर 2009मध्ये पुन्हा त्याला खासदारकी मिळाली. मात्र, 2014मध्ये भाजपनं निवडणुकीचं तिकीट त्यांना दिलं नाही. त्यांना राज्यसभेत पाठवण्यात आलं होतं. मात्र त्यांनी भाजपला चिट्टी देत 2017ला कॉंग्रसेचा हात धरला. त्यानंतर सिद्धू पंजाबकडून विधानसभेत निवडणुक आले.दरम्यान किर्ती आझाद यांनीही बंडखोरी करुन कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.

क्रिकेटपटूंसाठी भाजप लकी, तर कॉंग्रेस...

भाजपनंतर कॉंग्रेसनं मोहम्मद अझरुद्दीन आणि मोहम्मद कैफ यांना संधी दिली होती. अझरुद्दीन 2009च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमधून उमेदवारी देण्यात आली होती, आणि त्याला खासदारकी मिळाली. मात्र, 2014 साली मोदी लाटेमुळं अझरुद्दीनला पराभव स्विकारावा लागला. 2019मध्ये मात्र त्याला उमेदवारी देण्यात आलेली नाही. मोहम्मह कैफनं 2014च्या लोकसभा निवडणुकीआधी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांनी उत्तरप्रदेशच्या फूलपुर येथून उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, मोदींच्या लाटेमुळं कैफला पराभव स्विकारावा लागला.

क्रिकेटच्या मैदानावर आणि राजकारणातही नाही चालले हे खेळाडू

भाजप आणि कॉंग्रेस या बढ्या पक्षांसह काही उमेदावार अपक्ष तर, काही उमेदवर एनडी तिवारी यांच्या ऑल इंडिया इंदिरा कॉंग्रेसकडूनही राजकारणात उतरले होते. विनोद कांबळीनंही क्रिकेटनंतर राजकारणात आपलं नशीब आजमावलं होतं. मात्र, त्याला राजकारणात यश आलं नाही. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत विक्रोळीतून कांबळी मैदानात उतरला होता. मनोज प्रभाकर यांना एनडी तिवारी यांच्या ऑल इंडिया इंदिरा कॉंग्रेसनं दक्षिण दिल्लीतून लोकसभेत उतरले होते. मात्र, लोकसभेत हरल्यानंतर ते पुन्हा राजकारणात उतरले नाही.

लोकसभेत क्रिकेटपटूंना पसंती

विधानसभेपेक्षा लोकसभेत क्रिकेटपटूंना जास्त पसंती दिली जात आहे. आतापर्यंत सर्वात जास्त क्रिकेटपटूंना लोकसभेचे तिकीट देण्यात आलं आहे. यात नवज्योत सिंग सिध्दू (अमृतसर), किर्ती आझाद (दरभंगा), चेतन चौहान (अमरोहा), मोहम्मद अझरुद्दीन (मुरदाबाद), मनोज प्रभाकर (दक्षिण दिल्ली), मनसुर अली खान पतौडी (भोपाळ आणि गुरगाव), मोहम्मद कैफ (अलाहाबाद)

विधानसभेपेक्षा लोकसभाच प्यारी

लोकसभेत क्रिकेटपटूंना पसंती मिळत असली तरी, त्यांच्या विजयाचा टक्का मात्र खालवला आहे. क्रिकेटपटूंचा लोकसभा निवडणुक जिंकण्याचा टक्का हा विधानसभा निवडणुकीच्या टक्क्यापेक्षा कमी आहे. हा टक्का केवळ 57.14 आहे. 7 पैकी केवळ 4 क्रिकेटपटूंना लोकसभा निवडणुकीत यश मिळाले आहे. सिद्धू, आझाद, चौहान आणि अझरुद्दीन यांना लोकसभेत यश आले आहे.

VIDEO: निकालाआधीच भाजप समर्थकांकडून विजयोत्सवाची जंगी तयारी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 21, 2019 03:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading