घरकुल घोटाळा : माजी मंत्री सुरेश जैन यांच्यासह 38 आरोपींची तुरुंगात रवानगी

घरकुल घोटाळा : माजी मंत्री सुरेश जैन यांच्यासह 38 आरोपींची तुरुंगात रवानगी

जळगाव घरकुल घोटाळ्याप्रकरणी सुरेश जैन, राष्ट्रवादीचे नेते गुलाबराव देवकर, चोपड्याचे विद्यमान आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या सर्व 48 आरोपींना न्यायालयाने दोषी ठरवले होते.

  • Share this:

दीपक बोरसे, धळे 3 सप्टेंबर : घरकुल घोटाळा प्रकरणी माजी मंत्री सुरेश जैन आणि गुलाबराव देवकर यांच्यासह 38 आरोपींची अखेर नाशिकच्या कारागृहात रवानगी करण्यात आली. या प्रकरणात. घरकुल प्रकरणात 48 दोषींना धुळे विशेष न्यायालयाने सुनावली होती शिक्षा. 48 पैकी 38 आरोपींची धुळे कारागृहातून नाशिक कारागृहात रवानगी. 10 आरोपी सध्या जिल्हा रुग्णालयात दाखल आहेत.

जळगाव घरकुल घोटाळ्याप्रकरणी सुरेश जैन, राष्ट्रवादीचे नेते गुलाबराव देवकर, चोपड्याचे विद्यमान आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या सर्व 48 आरोपींना न्यायालयाने दोषी ठरवले होते. नंतर विशेष जिल्हा न्यायाधीश सृष्टी नीलकंठ यांनी सुरेश जैन यांना 7 वर्षांचा कारावास आणि 100 कोटींचा दंड ठोठावला. गुलाबराव देवकर यांना 5 वर्षांची शिक्षा आणि 5 लाखाचा दंड ठोठावण्यात आला. तर माफीच्या साक्षीदार सिंधू विजय कोल्हे यांची याप्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. या घोटाळ्यातील दोषी प्रदीप रायसोनी 7 वर्षांची शिक्षा आणि 10 लाख दंड, राजेंद्र मयूर आणि जगन्नाथ वाणी यांना 7 वर्षांचा कारावास आणि प्रत्येकी 40 कोटींपर्यंत दंड ठोठावण्यात आला आहे. सर्व संशयित 48 आरोपींना ताब्यात घेण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले होते.

विधानसभेसाठी भाजपचा सर्व्हे तयार, महायुतीला इतक्या जागा मिळण्याचा अंदाज

निकालाचे कामकाज चालले तब्बल 20 तास...

धुळे विशेष न्यायालयात घरकुल घोटाळ्याच्या निकालाचे कामकाज तब्बल 20 तास चालले. शनिवारी सायंकाळी पाच वाजता न्यायालयाने दोषींना शिक्षा सुनावली. मात्र, आरोपींच्या निकाल पत्र देण्यासाठी काम रविवारी पहाटेपर्यंत चालले. सकाळी 6 वाजता पोलिसांनी सर्व 48 दोषींना न्यायालयातून वैदकीय तपासणीसाठी नेले. न्यायालयाच्या आवारातून बाहेर पडत असताना अनेक दोषींना रडू कोसळले. हिरे वैद्यकीय महाविद्यालयात सर्व दोषींची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांची धुळे जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली.

परळीत प्रेमप्रकरणातून हत्या.. अल्पवयीन भावांनी बहिणीच्या प्रियकराला संपवले

काय आहे जळगाव घरकुल घोटाळा?

'घरकुल योजना' ही जळगाव नगरपालिकेची योजना होती. झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांना स्वस्त दरात चांगली घरे देण्यासाठी तत्कालीन नगरपालिकेतील सत्ताधारी गटाने झोपडपट्टी निर्मूलनाच्या उद्देशाने ही योजना राबवण्याचे ठरवले होते. त्यासाठी हरी विठ्ठलनगर, खंडेरावनगर, समतानगर आणि तांबापुरा या ठिकाणी सुमारे 110 कोटींचे कर्ज काढून 11 हजार घरकुले बांधण्याच्या कामास 1999 मध्ये सुरुवात झाली होती.

उस्मानाबादमध्ये आघाडीला दुसरा धक्का, नेता शिवसेनेत प्रवेश करणार

मात्र, या योजनेतील सावळागोंधळ सन 2001 मध्ये समोर आला. सुरुवातीपासूनच अनियमितता, कायद्याचे उल्लंघन, मनमानी पद्धतीने निर्णय, गैरव्यवहार यांचे लचांड उघडकीला आले. पालिकेने घरकुले ज्या जागांवर बांधली, ती जागा पालिकेच्या मालकीची नव्हती. त्यासाठी बिगरशेती परवानगी घेतली गेली नव्हती. सत्ताधाऱ्यांनी मर्जीतील खानदेश बिल्डर्सला हे काम दिले. या ठेकेदाराला नियमबाह्य पद्धतीने सुमारे 29 कोटी रुपये बिनव्याजी आणि आगाऊ देण्यात आले. ठेकेदारास विविध सवलती देण्यात आल्या. निविदेतील काम पूर्ण करण्याची मुदत ठेकेदाराने पाळली नाही. उपरोक्त कामास पाच वर्षांहून अधिक विलंब करणाऱ्या ठेकेदारावर सत्ताधारी गटाने कोणतीही कारवाई केली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 3, 2019 03:18 PM IST

ताज्या बातम्या