मालेगाव, 02 फेब्रुवारी : मालेगाव शहरातील जाफर नगर, मिल्लत नगर, आयेशा नगर भागात 20 ते 25 गुंडांच्या टोळक्याने मध्यरात्री हातात गावठी पिस्तुल, तलवारी, चापर घेऊन घुडदुस घातला आहे. या संपूर्ण प्रकारामुळे परिसरात मोठं भीतीचं वातावरण पसरलं आहे.
गुंडांनी परिसरात असलेल्या हॉटेल, रिक्षा आणि इतर वाहनांची तोडफोड केली. या हल्ल्यात 5 जण जखमी झाले असून तिघांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीती पसरून पळापळ झाली. गुंडांच्या 2 टोळीत सुरू असलेल्या वर्चस्ववादातून हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी गुन्हा दाखल करू गुंडांचा शोध घेत आहे.
दरम्यान, गुन्हेगारीने आता तख्त गाठला आहे. त्यामुळे कोणीही उठतं आणि थेट तलवारीची भाषा करतं. त्यामुळे आताच्या तरुणाईला पोलिसांचा धाक उरला नाही का असा सवाल उपस्थित होतो.
तर पोलिसांनी आता परिसरातून या हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी कसून चौकशी करण्यात सुरुवात केली आहे. त्यासाठी आता परिसरातले सीसीटीव्हीदेखील तपासण्यात येणार आहे.
VIDEO: ठाकरेंची अब्रू रस्त्यावर काढीन नादाला लागायचं नाय - निलेश राणे