पुण्यात लॉकडाऊनमुळे प्रसिद्ध हॉटेल व्यवस्थापकावर ओढावलं नैराश्य, उचललं टोकाचं पाऊल

पुण्यात लॉकडाऊनमुळे प्रसिद्ध हॉटेल व्यवस्थापकावर ओढावलं नैराश्य, उचललं टोकाचं पाऊल

कोरोना संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली. याच नैराश्यातून पुण्यात हॉटेल व्यवस्थापकाने टोकाची भूमिका घेतली आहे.

  • Share this:

धायरी (पुणे), 25 जून : राज्यात कोरोनाच्या महामारीमुळे अनेकांनी प्राण गमावले. पण या संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली. याच नैराश्यातून पुण्यात हॉटेल व्यवस्थापकाने टोकाची भूमिका घेतली आहे.

सिंहगड रस्त्यावरील धायरी परिसरात एका हॉटेल व्यवस्थापकाने हॉटेलमध्येच गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सदर प्रकार आज गुरुवार सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास उघडीस आला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. प्रेमनाथ कृष्णा शेट्टी (वय: 43 वर्षे, रा. हॉटेल राज, धायरी, ता. हवेली जि. पुणे) असं आत्महत्या केलेल्या हॉटेल व्यवस्थापकाचं नाव आहे.

राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मिळाला दिलासा, केंद्र शासनाने दिला महत्त्वाचा निर्णय

सिंहगड रस्ता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेमनाथ हे गेल्या सात वर्षांपासून 'हॉटेल राज' चालवत होते. लॉकडाऊनमुळे गेल्या चार महिन्यांपासून हॉटेल बंद होतं. त्यामुळे नैराश्य येऊन त्यांनी हॉटेलमध्येच पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. गुरुवारी सकाळी साडे नऊच्या सुमारास एका कर्मचाऱ्याने हॉटेल उघडल्यानंतर सदर घटना उघडीस आली.

दरम्यान, घटनास्थळी सुसाइड नोट मिळाली असून 'लॉकडाऊनमुळे हॉटेल बंद आहे. त्यामुळे मला नैराश्य आल्यानं मी आत्महत्या करत आहे. माझ्या आत्महत्येस कोणालाही जबाबदार धरू नये' असं त्यात लिहिलं आहे. पुढील तपास सिंहगड रस्ता पोलीस करीत आहेत.

महाराष्ट्राच्या आणखी एका पुत्राला वीरमरण, दोन जवानांचा जीव वाचवताना झाले शहीद

घटनेची माहिती मिळाल्यानंतर, पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी प्रेमनाथ यांचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. तर पोलीस सध्या या संपूर्ण प्रकरणाचा कसून तपास करत आहे.

संपादन - रेणुका धायबर

First published: June 25, 2020, 3:19 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading