आंघोळीला गेलेले सैनिक शाळेचे विद्यार्थी गरम पाण्याने भाजले, 2 गंभीर

आंघोळीला गेलेले सैनिक शाळेचे विद्यार्थी गरम पाण्याने भाजले, 2 गंभीर

त्याच वेळी दुसऱ्या बाजूकडील गरम पाण्याचा नळ तोटी सकट बाहेर पडला. त्या नळातील गरम पाणी मुलांच्या अंगावर पडलं.

  • Share this:

नागपूर 26 फेब्रुवारी : आंघोळीला गेलेले सैनिक शाळेचे 4 विद्यार्थी भाजल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. यात चारही विद्यार्थी भाजले असून त्यातल्या दोघांची प्रकृती गंभीर आहे. अमरावती जिल्ह्यातील जुना धामणगाव येथील मुकुंदराव पवार मिल्ट्री स्कूल या शाळेचे हे सर्व विद्यार्थी आहेत. हे विद्यार्थी सकाळी आंघोळीसाठी गेले होते. आंघोळ करत असतांना अचानक गरम पाण्याचा नळ तुटला आणि 4 विद्यार्थी भाजले. नळातलं पाणी हे अतिशय गरम होतं. तोटी तुटल्याने पाणी वेगात अंगावर आलं. नळापासून दूर होईपर्यंत सर्व विद्यार्थी चांगलेच भाजले.

धामणगाव येथील डॉ. मुकुंदराव पवार सैनिकी शाळेत पहिली ते बारावी पर्यंतचे विद्यार्थी शिक्षण घेतात. निवासी शाळेतील इयत्ता दुसरी ते चवथीचे काही विद्यार्थी आंघोळ करण्याकरिता गेले होते. काही विद्यार्थी त्या ठिकाणी ब्रश करीत होते. त्यांच्यावर लक्ष ठेवण्याकरिता चार महिला कर्मचारी सुद्धा होत्या. विद्यार्थ्यांनी आंघोळीसाठी कपडेही काढले होते.

त्याच वेळी दुसऱ्या बाजूकडील गरम पाण्याचा नळ तोटी सकट बाहेर पडला. त्या नळातील गरम पाणी मुलांच्या अंगावर पडलं. यात प्रित पराते हा विध्यार्थी 52 टक्के, मोहित चौहान 44 टक्के, गणेश ठाकरे 30 टक्के तर शिव चौहान 8 टक्के भाजला गेला अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

काही मिनिटं उशीर झाल्याने परीक्षा केंद्रात विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला

या मुलांवर नागपूरच्या ऑरेंजसीटी रुग्णालयात उपचार सुरू असून दोघांची प्रकृती नाजूक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

जखमी विद्यार्थ्यांना चांगले उपचार मिळावे म्हणून आम्ही त्या विद्यार्थ्यांना नागपुरच्या ऑरेंजसिटी रुग्णालयामध्ये दाखल केले आहे. उपचाराचा जो काही खर्च लागेल तो खर्च संस्थेमार्फत केल्या जाईल असे संस्थेचे सचिव शिवाजी पवार यांनी सांगितले.

हेही वाचा...

आदित्य ठाकरेंवर भाजपचा पलटवार, फडणवीसांवरच्या आरोपांना दिलं उत्तर

भाजपला धक्का, फडणवीसांचे निकटवर्तीय खासदार राष्ट्रवादीच्या वाटेवर - सूत्र

First published: February 26, 2020, 4:51 PM IST

ताज्या बातम्या