VIDEO: मानव जातीला काळीमा, रुग्णालयाचं बिल भरलं नाही म्हणून वृद्धाला खाटेला बांधलं

VIDEO: मानव जातीला काळीमा, रुग्णालयाचं बिल भरलं नाही म्हणून वृद्धाला खाटेला बांधलं

रुग्णालयाचं बिल भरण्यासाठी पैसे नसल्यामुळे एका वृद्ध व्यक्तिला खाटेला बांधल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 07 जून : कोरोनाच्या संकटात आरोग्य सेवा पुरवणारे डॉक्टर्स आणि कर्मचारी आपल्यासाठी दिवसरात्र काम करत आहेत. पण अशात मनाव जातीला काळीमा फासणारी एक घटना उघडकीस आली आहे. रुग्णालयाचं बिल भरण्यासाठी पैसे नसल्यामुळे एका वृद्ध व्यक्तिला खाटेला बांधल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे.

मध्य प्रदेशातील शाजापूरमध्ये एक वृद्ध व्यक्ती उपचारासाठी रुग्णालयात दाखल होते. पण रुग्णालयाचं बिल भरण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. त्यामुळे चिडलेल्या रुग्णालयातील स्टाफने त्यांना बेडला बांधून ठेवलं. ही बातमी समजताच दोषींवर कारवाई करावी अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केली आहे.

सीएम शिवराज यांनी ट्विटरवर लिहिलं की, 'शाजापूरमधील रुग्णालयात ज्येष्ठ नागरिकावर अत्याचार केल्याची बाब निदर्शनास आली आहे. दोषींना अजिबात माफ केलं जाणार नाही, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल.'

मिळालेल्या माहितीनुसार, वृद्ध व्यक्तीला ओलीस ठेवण्यात आलं होतं आणि घटनेच्या तीन ते चार दिवसांपूर्वी त्यांना योग्य जेवणही दिलं जात नव्हतं असा आरोप पीडितेच्या कुटुंबियांनी केला आहे. पण याबद्दल रुग्णालय प्रशासनाला विचारलं असता त्यांनी हे आरोप फेटाळले आहेत.

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनीदेखील हासंबंधी एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. यावेळी त्यांनी लिहिलं की, "राज्यातील शाजापूरमधील रूग्णालयात वृद्ध व्यक्तीला अशी अमानवी वागणूक दिली जात आहे." या बातमीमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली असून तात्काळ रुग्णालयावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

संपादन - रेणुका धायबर

First published: June 7, 2020, 2:42 PM IST
Tags:

ताज्या बातम्या