राशीभविष्य : कर्क आणि तूळ राशीच्या व्यक्तींनी आज ठेवायला हवं रागावर नियंत्रण

राशीभविष्य : कर्क आणि तूळ राशीच्या व्यक्तींनी आज ठेवायला हवं रागावर नियंत्रण

कसा असेल आजचा दिवस जाणून घ्या 28 जूनचं राशीभविष्य.

  • Share this:

मुंबई, 28 जून : प्रत्येक दिवस सारखा नसतो. आपल्या राशीतील बदलत्या स्थितीचा परिणाम आपल्या दिवसावर होत असतो. येणाऱ्या समस्यांची पूर्वकल्पना आपल्याला मिळाली तर समस्या सोडवणं अधिक सोपं होतं यासाठीच जाणून घ्या 12 राशींसाठी कसा असेल 28 जूनचा दिवस.

मेष- आज आपला आत्मविश्वास वाढेल. प्रगती आणि आर्थिक सुधारणा निश्चित आहे. जोडीदाराला दिलेल्या प्रॉमिसचं पालन करा.

वृषभ- प्रेमात आज सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. जोडीदाराला सपोर्ट करा.

मिथुन- जास्त काळजी केल्यानं मनसिक त्रास जास्त होईल. काम पूर्ण झाल्याचं समाधान मिळेल. यशाच्या दृष्टीनं पावलं उचलायला हवीत.

कर्क- आपल्याला आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता आहे. आपली मेहनत येणाऱ्या आठवड्यात फळाला येईल.

हे वाचा-पावसाळा आला म्हणून सोडू नका उन्हाळ्यातील या सवयी; नाहीतर त्वचेवर होईल दुष्परिणाम

सिंह- मानसिक शांतता भंग होऊ शकते. हे टाळा, कारण थोडेसे चिंता आणि मानसिक तणाव देखील शरीरावर वाईट परिणाम करतो. आर्थिक सुधारण निश्चित आहे.

कन्या- आर्थिक समस्यांचा सामना करावा लागेल. आजचा दिवस तुमच्यासाठी खूप रोमँटिक असणार आहे. बर्‍याच दिवसांनी आपण बर्‍याच झोपेचा आनंद घेऊ शकाल.

तुळ- आज तुम्हाला थकवा जाणवेल आणि छोट्या छोट्या गोष्टींवर राग येऊ शकेल. आर्थिक सुधारणांमुळे आपल्याला आवश्यक असलेल्या वस्तू खरेदी करणे शक्य होईल.

हे वाचा-2 वर्ष ज्या झाडाला घातलं पाणी; त्याच्याबाबत असं काही समजलं की महिलेला बसला शॉक

वृश्चिक- गुंतवणुकीतून फायदा मिळेल. कुटुंबासह प्रेमळ क्षण व्यतीत करा. एखाद्या नवीन व्यक्तीबद्दल मनात प्रेमाची भावना निर्माण होऊ शकते.

धनु- आपल्यासाठी पुरेसा वेळ असेल, म्हणून संधीचा फायदा घ्या. गुंतवणूक आणि भविष्यातील योजना गुप्त ठेवा.

मकर - आरोग्याच्या समस्या उद्भवतील. गुंतवणुकीतून फायदा मिळेल

कुंभ- गुंतवणूक करण्याआधी नीट माहिती घ्या. आज प्रेमासाठी खूप चांगला दिवस आहे. जोडीदारावर शंका घेण्यातून संघर्ष उद्भवेल.

मीन- परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाणार नाही याची काळजी घ्या. आपल्या प्रगतीमध्ये अडथळे येण्याची शक्यता आहे.

संपादन- क्रांती कानेटकर

First published: June 28, 2020, 7:05 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading