मुंबई, 29 नोव्हेंबर : प्रत्येक दिवस सारखा नसतो. येणाऱ्या दिवसातील समस्या आणि आव्हानं कोणती याची पूर्वकल्पना मिळाली तर त्यावर तोडगा काढणं सोपं जातं. यासाठीच जाणून घ्या कसा असेल आजचा आपला दिवस.
मेष- आज आपला संपूर्ण दिवस धावपळीचा असणार आहे. आज आपल्याला नफा देखील मिळू शकतो. कदाचित लांबचा प्रवास आज आपल्याला करावा लागेल.
वृषभ- प्रवासामुळे आपल्याला खूप थकवा आला असेल. बेफिकीर वृत्तीमुळे समस्या ओढवून घ्याल. अंथरुण पाहून पाय पसरायला हवेत.
मिथुन- जुन्या भेटीगाठींमुळे आपल्याला आनंद होईल. कामाचा दबाव असू शकेल. प्रवास महाग पण फायद्याचे असतील.
कर्क- पैशांची चणचण भासू शकते. करमणुकीवर वेळ आणि पैसा खर्च करू नका. बोलताना शब्द जपून वापरा.
सिंह- प्रवासामुळे थकवा जाणवेल. आपल्या भोवतालच्या लोकांच्या वागण्याचा आपल्याला राग येईल.
कन्या- आशावादी राहा आपल्या चांगल्या बाजू अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न करा. आज आपली निराशा दूर करा.
हे वाचा-प्रेग्नन्सीनंतर करिअरला रामराम ठोकणार? अनुष्का शर्माचा मोठा खुलासा
तुळ- आरोग्य चांगलं राहिल. आत्मविश्वास वाढवण्यावर भर द्या. कौटुंबीक समस्यांमुळे आज आपली मानसिक शांतता भंग होऊ शकते.
वृश्चिक- आज आपल्याला खूप थकवा आल्यासारखं वाटू शकतं.अनपेक्षित खर्च आपल्यावर आर्थिक भार टाकू शकतात.
धनु- आज आपली मेहनत फळाला येईल. स्वतःच्या निर्णयामुळे थोडा त्रास होऊ शकतो.
मकर - आज आपला मूड चांगला नसल्यानं अनेक अडथळे आणि समस्यांचा सामना करणं कठीण जाईल.
कुंभ- आरोग्याची अति काळजी घेणं आवश्यक आहे. कुठल्याही लहान गोष्टीकडे देखील नजरअंदाज करू नका. आजची संध्याकाळ खूप खास असू शकते.
मीन- आपल्या इच्छा पूर्ण न झाल्यामुळे निराश व्हाल. कामावर लक्ष केंद्रीत करा. धाडसी पाऊल उचलताना विशेष काळजी घ्या.
Published by:Kranti Kanetkar
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.