मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

राशीभविष्य : तुळ आणि वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आज प्रवासाचा योग

राशीभविष्य : तुळ आणि वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आज प्रवासाचा योग

मेष आणि मीन राशीच्या व्यक्तींना कोणत्या समस्यांचा सामना करावा लागेल जाणून घ्या 26 डिसेंबरचं राशीभविष्य.

मेष आणि मीन राशीच्या व्यक्तींना कोणत्या समस्यांचा सामना करावा लागेल जाणून घ्या 26 डिसेंबरचं राशीभविष्य.

मेष आणि मीन राशीच्या व्यक्तींना कोणत्या समस्यांचा सामना करावा लागेल जाणून घ्या 26 डिसेंबरचं राशीभविष्य.

  • Published by:  Kranti Kanetkar
मुंबई, 26 डिसेंबर : येणारा प्रत्येक दिवस अधिक चांगला आणि उत्साही बनवण्यासाठी तो कसा असेल याची पूर्वकल्पना मिळणं गरजेचं असतं. यासाठी जाणून घ्या कसा असेल आजचा आपला दिवस. कोणत्या राशीला करावा लागेल समस्यांचा सामना आणि कोणत्या राशीसाठी असेल शुभ. मेष- खाण्यापिण्याच्या सवयींकडे लक्ष द्या. आज आपल्या व्यक्तीचं मत घेण्यास अजिबात संकोच करू नका. वृषभ- आज ताण आणि चिंता टाळा वाईट वेळ अधिक शिकवते. त्यामुळे संयम सोडू नका धीरानं घ्या. मिथुन- आज आपल्याला सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे. प्रेमाबाबत आज आपण गंभीर असणं गरजेचं आहे. प्रवासासाठी आजचा दिवस चांगला नाही. कर्क- ताण कमी करण्यासाठी आज आपण संगीताचा आसरा घेऊ शकता. आपला दिवस आनंदी होईल. सिंह- आज आपणलं वागणं थोडं चिडचिड असेल. प्रेमाच्या दृष्टीकोनातून, आज आपण जीवनातील रसांचा पूर्ण आनंद घेऊ शकाल. आज आपल्या पदरी निराशा येण्याची शक्यता आहे. कन्या- आज आपल्याला आजारी असल्यासारखं वाटू शकतं. आजचा दिवस आपल्याला कंटाळवाणा वाटेल विशेष फायदा मिळवून देणारा नाही. तुळ- आज सकारात्मक भावनांना प्रोत्साहन द्या. आज आपला दिवस धावपळीत जाईल. प्रवास आणि करमणूक भेटीगाठी अशा अनेक गोष्टी घडणार आहेत. हे वाचा-'थप्पड' फेम तापसी पन्नू रांचीतील लिट्टी-चोखाच्या प्रेमात वृश्चिक- आजचा दिवस फायदा मिळवून देणारा नाही. आपल्यामुळे नुकसान होऊ शकतं. धनु- आज आपली चिडचिड होऊ शकते. आज आपलं प्रिय व्यक्तीसोबत भांडण होईल. कामाच्या ठिकाणी आज आपण अव्वल असाल. मकर - घाईगडबडीत कोणताही निर्णय घेऊ नका. अचानक प्रवास अथवा नियोजन बदलण्याची वेळ आज आपल्यावर येईल. कुंभ- ऊर्जा आणि उत्साहानं भरलेला दिवस असेल. मीन-स्वार्थी लोकांच्या जाळ्यात अडकू नका. आर्थिक सुधारणा होईल.
First published:

Tags: Astrology and horoscope

पुढील बातम्या