डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह पत्नीला कोरोना, पंतप्रधान मोदी झाले भावुक, म्हणाले...

डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह पत्नीला कोरोना, पंतप्रधान मोदी झाले भावुक, म्हणाले...

ट्रम्प यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्यांना काळजी घेण्याचं आवाहन देखील केलं आहे. याची माहिती स्वत: त्यांनी ट्वीट करून दिली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 02 ऑक्टोबर : कोरोना आकडेवारीच्या यादीत पहिल्या स्थानावर असलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या घरात कोरोना शिरला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलानिया या दोघांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. या संदर्भात डोनल्ड ट्रम्प यांनी स्वत: ट्वीट करून माहिती दिली.

ट्रम्प यांची खासगी सल्लागार हिक्सला कोरोनाची लक्षणं सुरुवातील दिसली होती. त्यानंतर त्यांनी टेस्ट केल्यावर कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. हिक्स या ट्रम्प यांच्या संपर्कात आल्या होत्या. त्यामुळे ट्रम्प आणि त्यांच्या पत्नीने स्वत:ला होम क्वारंटाइन केलं होतं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह त्यांच्या पत्नीचा रिपोर्टही कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. ट्रम्प यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्यांना काळजी घेण्याचं आवाहन देखील केलं आहे. याची माहिती स्वत: त्यांनी ट्वीट करून दिली आहे.

हे वाचा-जगातले सर्वांत मोठे लस उत्पादक कोण? KBC च्या प्रश्नाचं उत्तर मिळेल पुण्यात

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांनी ट्वीट केलं. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्वीट करून प्रार्थना केली आहे. माझे मित्र कोरोना पॉझिटिव्ह आले असून यातून लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना केली आहे. अमेरिका सध्या जगात कोरोनाच्या यादीत पहिल्या स्थानावर तर भारत दुसऱ्या स्थानावर आहे.

एककीकडे अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीच्या प्रचारात मोदींचा ट्रेन्डही पाहयला मिळत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी लवकर बरं व्हावं असं म्हणत मोदी ट्वीट केलं असून कोरोनाच्या या बातमीमुळे ते भावुक झाल्याचं पाहायला मिळालं.

Published by: Kranti Kanetkar
First published: October 2, 2020, 11:53 AM IST

ताज्या बातम्या