CAA अजून कायद्याची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही; गृह मंत्रालय म्हणतं- आंदोलन करा पण सूचनाही द्या

CAA अजून कायद्याची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही; गृह मंत्रालय म्हणतं- आंदोलन करा पण सूचनाही द्या

नागरिकत्व सुधारणा कायद्याला देशभरातून होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर आणि हिंसक आंदोलनं सुरू झाल्यानंतर केंद्र सरकारने या कायद्याविषयीची सावध पवित्रा घेतलेला दिसतो.

  • Share this:

नवी दिल्ली, 20 डिसेंबर : नागरिकत्व सुधारणा कायद्याला देशभरातून होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर आणि हिंसक आंदोलनं सुरू झाल्यानंतर केंद्र सरकारने या कायद्याविषयीची भूमिका थोडी नरमाईची झालेली दिसते. गृहमंत्रालयाने या कायद्याविषयी थोडा सावध पवित्रा घेतलेला दिसतो. हा कायदा अद्याप लागू झालेला नाही. या कायद्याविरोधात कुणीही कोर्टात जाऊ शकतं. अर्थात लोकांना याचा निषेध करायचं, याविरोधात आंदोलन करायचं स्वातंत्र्य आहे. पण कुणाला यासंबंधी सूचना द्यायच्या असतील तर देऊ शकता, असं मंत्रालयातर्फे Ministry of Home Affairs (MHA) सांगण्यात आलं आहे.

गृह मंत्रालयातल्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ते कायद्याच्या चौकटीत नियम बसवण्याच्या प्रक्रियेत आहेत. कुणाला काही सूचना, द्यायचे असतील तर ते देऊ शकतात. आम्ही सर्वांबरोबर चर्चा करूनच हे विधेयक संसदेत मांडलं. त्यावर दोन्ही सभागृहात चर्चाही झालेली आहे. सुधारित नागरिकत्व कायदा अद्याप लागू झालेला नाही. प्रक्रिया अजून सुरू आहे, असंही सूत्रांनी सांगितलं.

या कायद्याची अंमलबजावणी आपल्या राज्यात करणार नाही अशी भूमिका ज्या राज्यात सत्तेवर भाजप सरकार नाही अशा बहुतेक राज्यांनी घेतली आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जाहीर केलं आहे. पंजाब, मध्य प्रदेश या काँग्रेस शासित राज्यांनीही कायद्याला विरोध केला आहे. पण राज्यांना या कायद्याची अंमलबजावणी करायची की नाही हे ठरवायचा अधिकार नाही, असं केंद्रीय गृहमंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. या कायद्याच्या अंमलबजावणीचे अधिकार केंद्राला आहेत. कायद्याच्या अंमलबजावणीसाठी कुणाला सामील करून घ्यायचे हे आम्ही ठरवणार, असंं मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितलं. CAA किंवा सुधारित नागरिकत्व कायद्याची प्रक्रिया ही सोपी असेल आणि डिजिटल असेल. लोकांना कुठलाही त्रास होऊ नये म्हणून डिजिटल यंत्रणा ठेवण्यात आली आहे, असं मंत्रालयातर्फे सांगण्यात आलं.

सुधारित नागरिकत्व कायदा अस्तित्वात आला असला, तरी राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (NRC) होणार का, कशी होणार याबाबत अद्याप स्पष्टता नाही. NRC बद्दल इतक्यात काही बोलणं योग्य ठरणार नाही, असं मंत्रालयातल्या सूत्रांनी सांगितलं.

-----------------------------

अन्य बातम्या

CAA च्या विरोधात उत्तर प्रदेश पेटलं; दिल्लीत जामा मशीद परिसरात तणाव

बीडमध्ये बंदला गालबोट; छत्रपती शिवाजी महाराज चौकात दगडफेक, पोलिसांकडून लाठीचार्ज

LIVE : दिल्लीत तणाव; जामा मशीद परिसरात जोरदार निदर्शनं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 20, 2019 05:21 PM IST

ताज्या बातम्या