लवकरच पेट्रोल, डिझेल घरपोच मिळणार, पेट्रोलियम मंत्र्यांची माहिती

पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना मांडली आहे.

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Apr 22, 2017 10:37 AM IST

लवकरच पेट्रोल, डिझेल घरपोच मिळणार, पेट्रोलियम मंत्र्यांची माहिती

21 एप्रिल : पेट्रोल किंवी डिझेल भरण्यासाठी आता पेट्रोलपंपावर जाऊन भल्यामोठ्या रांगेत तात्काळ उभं राहण्याची गरज नाही. सरकारी तेल कंपन्यांतर्फे घरपोच पेट्रोल अथवा डिझेल पोहोचवण्यात येण्याची शक्यता आहे. ई-कॉमर्सच्या मदतीने या योजनेची अंमलबजावणी करण्याचा विचार केंद्र सरकार करीत आहे.

पेट्रोलियम मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना मांडली आहे. काल (शुक्रवारी) श्रीनगरमध्ये संसदीय मंडळाच्या बैठकीत त्यांनी योजनेचे सूतोवाच केलं.

'ही योजना प्रत्यक्षात आल्यास इंधन खरेदीसाठी डिजिटल व्यवहारांचा अवलंब केला जाईल आणि पेट्रोलपंपांवर रांगेत उभारण्याचा ग्राहकांचा वेळही वाचेल,' असा विश्वास प्रधान यांनी व्यक्त केला. तसं ट्विटही त्यांनी केलं आहे.

या योजनेनुसार ग्राहकांनी ऑनलाइन माध्यमातून पेट्रोल किंवा डिझेलची मागणी रजिस्टर केल्यानंंतर सरकारी तेल कंपन्यांतर्फे ते त्यांना घरपोच देण्यात येणार आहे.

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 22, 2017 10:32 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...