Home /News /news /

रत्नागिरीत दारूच्या होम डिलिव्हरीचा निर्णय, पण 24 तासात झाला मोठा बदल

रत्नागिरीत दारूच्या होम डिलिव्हरीचा निर्णय, पण 24 तासात झाला मोठा बदल

तळीरामांची झुंबड उडाल्यामुळे काही जिल्ह्यात पुन्हा एकदा दारू बंदी करण्यात आली. त्यामुले घरपोच दारू देण्याची आयडिया लढवली गेली.

    रत्नागिरी, 07 मे :  कोरोना व्हायरसाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून देशात तिसऱ्या टप्प्यात लॉकडाउन सुरू आहे. 17 मे या तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाउन राहणार आहे. परंतु, या टप्प्यात दारू विक्री करण्यास सरकारने मुभा दिली आहे. परंतु, तळीरामांची झुंबड उडाल्यामुळे काही जिल्ह्यात पुन्हा एकदा दारू बंदी करण्यात आली. यात रत्नागिरीत घरपोच दारू विक्रीची शक्कल लढवली गेली. पण, हा निर्णय मागे घ्यावा लागला. गेल्या 42 दिवसांपासून बंद असलेल्या दारुची दुकानं खुले करण्यास परवानगी दिल्यानंतर तळीरामांना पार आकाश मोकळे झाले. राज्यात ठिकठिकाणी वाईन्स शॉप बाहेर तळीरामांनी लांबच्या लांब रांगा लावल्यात. पण, कोरोनाच्या परिस्थितीत ही बाब गंभीर असल्यामुळे काही जिल्ह्यात दारू बंदीचा निर्णय मागे घेण्यात आला. पण, यावर तोडगा म्हणून दारुची होम डिलिव्हरी (Home Delivery) सुरू करण्याचा विचार पुढे आला. काही राज्यांनी याची सुरुवात देखिल केली आहे. हेही वाचा- धक्कादायक! कोरोनावर लस शोधण्याआधीच चिनी प्राध्यपकाची गोळ्या झाडून हत्या मग काय? राज्यातील रत्नागिरी जिल्ह्यात घरपोच दारू देण्याची सेवा सुरू करण्यात येणार आहे, अशी घोषणाच जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत मिश्रा यांनी  करून टाकली. एवढंच नाहीतर यासाठी एक नियमावलीही तयार करण्यात आली. त्यानुसार, मद्यपींना आधी ऑनलाइन फॉर्म भरावा लागले. त्यानंतरच त्यांना घरपोच दारूची सेवा मिळू शकेल. याशिवाय दारूची होम डिलिव्हरी करणाऱ्या वाहनांना अधिकृत पास देण्यात येणार येईल. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये सर्व नियम पाळले जाईल, असं म्हणत जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत मिश्रा यांनी हे आदेश काढले होते. हेही वाचा-कोरोना योद्धांना सॅल्युट! एक वर्षाच्या चिमुरड्याला खेचून आणलं मृत्यूच्या दारातून पण, अवघ्या 24 तासांत हा निर्णय मागे घ्यावा लागला. खुद्द जिल्ह्याधिकाऱ्यांनी याबद्दल खुलासा केला आहे. राज्यात खुली दारू विक्रीसाठी परवानगी आहे. पण, कायद्यात तरतूद नसताना दारू घरपोच देता येत नाही. त्यामुळे जिल्ह्याधिकाऱ्यांना हा निर्णय मागे घ्यावा लागला. होम डिलिव्हरीचा निर्णय मागे घेण्यात आल्यामुळे तळीरामांची पुन्हा एकदा हिरमोड झाली. राज्यात दोन दिवसात तब्बल 106 कोटी 30 लाखांची दारू विक्री दरम्यान, राज्यात मद्य विक्रीस परवानगी देण्यात आली.  दोन दिवसांमध्ये म्हणजे गेल्या 48 तासांत तळीरामांनी तब्बल 106 कोटी 30 लाख रुपयांचे मद्य विकत घेतल्याचं स्पष्ट झालं आहे. तर मुंबईत गेल्या दोन दिवसात तब्बल 43 कोटी 75 लाख रुपयांची दारू विक्री झाली आहे.  मंगळवारी 24 तासांत तळीरामांनी 62 कोटी 55 लाख रुपयांचे मद्य विकत घेतले होते. तर राज्यांत 31 जिल्ह्यात मद्य विक्री सुरू करण्यात आली आहे. 9 जिल्ह्यात मद्य विक्रीस मनाई तर 4 जिल्हयात सुरू केलेली मद्य विक्री पुन्हा बंद केली आहे. संपादन - सचिन साळवे
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या