धक्कादायक ! Netflixची मालिका पाहून 12 वर्षांच्या मुलीची आत्महत्या

धक्कादायक ! Netflixची मालिका पाहून 12 वर्षांच्या मुलीची आत्महत्या

पालकांनो वेळीच व्हा सावधान... तुमची मुलं Netflixची ही मालिका पाहत आहेत का?

  • Share this:

वॉशिंग्टन, 6 मे : Netflixवरील '13 reasons why' मालिका प्रचंड वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या वादग्रस्त मालिकेविरोधात अमेरिकेत आणखी एक तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. '13 reasons why' ही मालिका पाहून अमेरिकेतील एका 12 वर्षांच्या मुलीनं गळफास घेऊन स्वतःचं आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जेसिका स्कॅटरसन असं आत्महत्या करणाऱ्या मुलीचं नाव आहे. जेसिकानं घरातील बाथरूममध्ये गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.

Netflixवरील '13 reasons why' मालिका जेसिकाच्या आत्महत्येमागील कारण असल्याचं म्हटलं जात आहे. तपासादरम्यान पोलिसांना जेसिकानं लिहिलेली सुसाईड नोटदेखील मिळाली. यामध्ये तिनं आपल्या मृत्यूसंदर्भातील सहा कारणं नमूद केली होती. मालिकेमधील पात्र ज्या प्रमाणे स्वतःचं आयुष्य संपवतात, अगदी त्याच पद्धतीनं जेसिकानं सुसाईड नोटमध्ये मुद्दे मांडले होते.

वाचा :Sacred Games 2 Teaser: सरताज सिंगचा काटेकर परत येणार का?

अशी आहे '13 reasons why'मालिकेची कहाणी

'13 Reasons Why' ही एक अमेरिकेतील मालिका आहे. ज्यामध्ये तरुण-तरुणींमधील नैराश्य आणि त्यांच्या आत्महत्यांच्या कहाणी दाखवल्या जातात.

मालिका पाहून केली आत्महत्या ?

जेसिकानं '13 reasons why' मालिका पाहून आत्महत्या केल्याचा संशय तिच्या आईनंही व्यक्त केला आहे. जेसिकाच्या आईनं सांगितलं की, 'माझी मुलगी ही मालिका पाहत असताना तिच्या वागण्यामध्ये प्रचंड बदल जाणवत होता. जेसिकानं आपल्या रूममध्ये फासावर लटकणाऱ्या मुलीचं चित्रदेखील काढलं होतं. तसंच तिच्या हातावर ब्लेडनं केलेले वारदेखील आढळले होते'.

वाचा : महिला ज्योतिषावर बलात्कार; हा टीव्ही अभिनेता गजाआड

वादग्रस्त मालिका बंदी करण्याची मागणी

Netflix ची ही मालिका यापूर्वीही प्रचंड वादात अडकली होती. या शोमध्ये एका मुलीवर झालेल्या बलात्काराची कहाणी दाखवण्यात आली होती. मालिकेमध्ये दाखवण्यात आलेल्या दृश्यांवर अनेक संघटनांनी तीव्र आक्षेपही नोंदवला होता. एवढे वाद निर्माण झाल्यानंतरही या मालिकेवर बंदी आणण्याबाबत अद्यापपर्यंत विचार करण्यात आलेला नाही.

ही मालिका पाहून आतापर्यंत 6 जणांनी आत्महत्या केली आहे. ही स्थिती पाहता मालिकेवर बंदी आणण्याची मागणी जोर धरू लागली आहे. दुसरीकडे, भारतात या मालिकेचे दोन सीझन रिलीज करण्यात आले असून लवकरच तिसराही सीझन रिलीज होण्याच्या मार्गावर आहे.

वाचा : Sacred Games 2 : काटेकर आणि कुक्कू परत येणार? नेटफ्लिक्सने शेअर केला नवा व्हिडीओ

VIDEO: स्मृती इराणी रडक्या, नवज्योत सिद्धू यांचा टोला

First published: May 6, 2019, 1:50 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading