फक्त चार दिवसांमध्ये तुटलं या 55 वर्षांच्या सुपरस्टारचं चौथं लग्न

फक्त चार दिवसांमध्ये तुटलं या 55 वर्षांच्या सुपरस्टारचं चौथं लग्न

फक्त चार दिवसांमध्ये दोघांनी एकमेकांना घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला. यानंतर सोशल मीडियावर त्यांचे चाहते लग्न मोडण्याचं कारण विचारत आहेत.

  • Share this:

न्यूयॉर्क, २९ मार्च- हॉलिवूडचा सुपरस्टार निकोलस केजच्या आयुष्याचं गणित बिघडतच चाललं आहे. सध्या त्याचं खासगी आयुष्यात एकामागोमाक एक संकटं येत आहेत. निकोलसने काही दिवसांपूर्वी मेकअप आर्टिस्ट एरिका कोइकशी (Erike Koike) लग्न केलं होतं. लग्नाच्या काही दिवसांनंतर एक धक्कादायक बातमी समोर आली. असं म्हटलं जातं की, फक्त चार दिवसांमध्ये दोघांनी एकमेकांना घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला. यानंतर सोशल मीडियावर त्यांचे चाहते लग्न मोडण्याचं कारण विचारत आहेत.

एवढ्या लवकर लग्न मोडण्याच्या बातमीवर अजूनपर्यंत निकोलस आणि एरिकापैकी एकानेही स्पष्टीकरण दिले नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार ५५ वर्षीय निकोलस केजने बुधवारी लग्न मोडण्याचा निर्णय घेतला. असं म्हटलं जातं की, शनिवारी दोघांनी मॅरेज सर्टिफिकेटची मागणी केली होती आणि त्याच दिवशी त्यांना लायसन्सही मिळालं होतं.

चार दिवसांमध्ये या दोघांच्या प्रतिनिधींपैकी एकानेही कोणत्याचं प्रकारचं उत्तर दिलं नाही. निकोलस आणि एरिकाने त्यांचं नातं फार कोणाला कळू दिलं नव्हतं. लग्नाआधी दोघं अनेकदा एकत्र दिसले होते मात्र त्यांनी आपलं नातं कधीच मान्य केलं नव्हतं. लग्नानंतर दोघांनी सर्वांसमोर आपलं नातं मान्य केलं. पण अवघ्या चार दिवसांमध्येच आता हे लग्न मोडत आहे.

निकोलस केजची आतापर्यंत तीन लग्न झाली आहेत. एरिकासोबतचं हे त्याचं चौथं लग्न होतं. निकोलसने १९९५ मध्ये पहिलं लग्न अभिनेत्री पेट्रीसिया अर्क्वेटशी केलं होतं. मात्र २००१ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर २००२ मध्ये त्याने लीजा मारीशी दुसरं लग्न केलं. हे लग्नही फार काळ टीकू शकलं नाही. २००४ मध्ये दोघांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला. यानंतर निकोलसने तिसरं लग्न एलिस किनशी केलं. दोघांचं हे लग्न १२ वर्ष टिकलं आणि पहिल्या दोन लग्नाप्रमाणे निकोलसने २०१६ मध्ये एलिसला घटस्फोट दिला. निकोलस केजला २८ वर्षांचा एक मुलगी आहे.

उत्तर मुंबई : उर्मिलाच्या राजकीय अंदाजासमोर विरोधकही धास्तावले

First published: March 29, 2019, 5:16 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading