ती मला दारू पिऊन नेहमी मारायची, हॉलिवूडच्या सुपरस्टारने

ती मला दारू पिऊन नेहमी मारायची, हॉलिवूडच्या सुपरस्टारने

घटस्फोट घेताना जॉनीने पत्नी दारू पिऊन मारहाण करायची असा आरोप केला होता. जॉनी डेप्पने न्यायालयात नवीन कागदपत्र सादर करत न्यायाधीशांसमोर आपलं मत मांडलं.

  • Share this:

हॉलिवूड अभिनेता जॉनी डेप्प पत्नीसोबतच्या घटस्फोटाबद्दल न्यायालयात आपली बाजू मांडताना पुरता कोसळला आणि रडतच त्याने आपली बाजू मांडली. पायरेट्स ऑफ कॅरेबियन सिनेमांच्या सीरिजमध्ये जॉनीने जॅक स्पॅरो ही व्यक्तिरेखा साकारली होती. ही व्यक्तिरेखा जगभरात प्रसिद्ध झाली होती. आजही अनेकजण जॉनीने जॅक स्पॅरो या नावानेच ओळखतात.

प्रियांकाबद्दल विचारल्यावर उखडला सलमान खान, म्हणाला...

जगातील सर्वात महागड्या अभिनेत्यांमध्ये जॉनीचं नाव घेतलं जातं. पण सध्या तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. जॉनीने पत्नी एंबर हर्डशी घटस्फोट घेतला आहे. एंबर आणि जॉनीमध्ये ५० मिलियन डॉलर भारतीय रुपयांनुसार सुमारे ३४८ कोटी रुपयांचा वाद सुरू आहे. जॉनीने एंबरवर मानहानी केल्याप्रकरणी एवढे रुपये देण्यास सांगितले आहेत.

दुबईत तब्बल 20 हजार फुटांवरून या बॉलिवूड अभिनेत्रीने मारली उडी आणि...

काय आहे पूर्ण प्रकरण-

जॉनी आणि एंबरने २०१६ मध्ये घटस्फोट घेतला होता. घटस्फोट घेताना जॉनीने पत्नी दारू पिऊन मारहाण करायची असा आरोप केला होता. जॉनी डेप्पने न्यायालयात नवीन कागदपत्र सादर करत न्यायाधीशांसमोर आपलं मत मांडलं.

एंबर हर्ड नेहमीच दारूच्या नशेत असायची आणि त्याच नशेत ती जॉनीला मारायचीही. अनेकदा जॉनीला गंभीर दुखापतही झाली आहे. जॉनीने न्यायालयात सांगितले की, अनेकदा एंबर बिछान्यातच शौच करायची. या घटनेनंतर जॉनी डेप्पने एंबरला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला.

…म्हणून वयाच्या 14 व्या वर्षी शाहरुखच्या मुलाने सोडलं होतं घर

SPECIAL REPORT : विवेक ओबेरॉयच्या मीमचा असा घेतला टि्वटरकरांनी बदला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 22, 2019 01:11 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading