काश्मीरमध्ये आणखी एक दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला, जैश आणि हिजबुलची बैठक

जैशनंतर आता हिजबुलने रचला मोठा कट, यासाठी पाकव्याप्त काश्मीरमध्ये बैठकही झाली.

  • Share this:

पुलवामात सीआरपीएफ ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने जैशचे प्रशिक्षण तळ उद्ध्वस्त केले. तरीही भारतात दहशतवादी हल्ला करण्याचा कट रचण्याचे काम दहशतवादी संघटनांकडून केले जात आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार हिजबुल मुजाहिद्दीनचा म्होरक्या सय्यद सलाहुद्दीनने काश्मीरमध्ये मोठी घुसखोरी करण्याचा कट आखला आहे.

पाकव्याप्त काश्मीरमध्ये सय्यदच्या नेतृत्वात हिजबुल मुजाहिद्दीनची बैठक झाली. यात काश्मीरमध्ये घुसखोरी करण्याचा कट रचण्यात आला आहे.

विशेष म्हणजे हिजबुलसोबत जैश ए मोहम्मदचे दहशतवादीदेखील यात होते. बालाकोटमधील त्यांचा प्रशिक्षण तळ भारताच्या हवाई दलाने नेस्तनाबूत केला.

सय्यद सलाहुद्दीनला सय्यद मोहम्मद युसूफ शाह या नावानेही ओळखलं जातं. दहशतवादी संघटना हिजबुल मुजाहिद्दीनचा तो म्होरक्या आहे.  तो काश्मीर खोऱ्यात दहशतवादी हल्ले करण्यात त्याचाही सहभाग असतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 6, 2019 01:19 PM IST

ताज्या बातम्या