वाराणसी, 24 सप्टेंबर : भारत-चीण तणावाच्या पार्श्वभूमीवर फ्रान्सकडून मागविलेल्या फायटर विमानं राफेलची मोठी चर्चा सुरू आहे. चीनसोबत सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर भारताने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले होते. त्यावेळीदेखील हे विमान कोण चालवणार याविषयी उत्सुकता होती. आता त्याबाबत खुलासा झाला आहे.
भारतीय वायु सेवाची महिला फायटर पायलटांची भर्ती सुरू झाल्यानंतर राफेल विमानातून झेप घेण्याचं सौभाग्य बनारसच्या शिवांगीला मिळालं आहे. बनारसमध्ये लहानपण गेलेल्या शिवांगीने भारतीय वायू सेनाच्या राफेल स्क्वाड्रनची पहिली महिला फायटर होण्याची संधी मिळाली आहे. आता वायूसेनेकडून फ्लाइट लेफ्टनंट शिवांगी सिंह राफेल विमानातून झेपावेल.
हे ही वाचा-'भाभा कवच' देणार सैन्याला सुरक्षा, AK 47 ची गोळीही भेदू शकणार नाही
महिला लडाऊ पायलटांच्या दुसऱ्या बॅचच्या रुपात 2017 मध्ये भारतीय वायू सेनामध्ये कमिशन मिळाला होता. वाराणसी जिल्ह्याची मूळ निवासी फ्लाइट लेफ्टनंट शिवांगी सिंग सध्या प्रशिक्षण घेत आहे. लवकरच शिवांगी अंबालामध्ये 17 स्क्वाड्रन गोल्डन एरोमध्ये सामील होईल. भारतीय वायू सेनामध्ये 2017 मध्ये सामील झाल्यानंतर शिवांगी सिंह मिग-21 बाइसन चालवत होती. शिवांगी सिंह हिने विंग कमांडर अभिनंदन वर्थमान याच्यासोबतही काम केलं आहे.
दैनिक जागरणला दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान शिवांगीने सांगितलं की, तिने विमान चालवावं हे वडिलांचं स्वप्न होतं. शिवांगीचे वडील कुमारेश्वर सिंह यांनी सांगितले की आम्हाला गर्व आहे की शिवांगी बनारससह देशाचं नाव मोठं करेल. शिवांगीने 2013 ते 2016 पर्यंत बीएचयूमधून एनसीसीचं प्रशिक्षण घेतलं आणि सनबीम भगवानपूर येथून बीएससी केलं.
चीनसोबत सुरू असेलल्या वादाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राफेन विमानं खरेदी केली आहे. दरम्यान भारत आणि चीनमध्ये राजनैतिक पातळीवर चर्चेच्या फेऱ्या सुरू असल्या तरी सीमेवरचा तणाव कमी झालेला नाही. शांतता राखण्याचं ठरल्यानंतरही चिनी सैन्याच्या हालचाली सुरूच आहे. त्यामुळे भारतीय लष्कर सावध असून त्यांनी चिनी लष्कराला मोठा दणका दिला. भारतीय लष्कराने LAC जवळच्या उंचावरच्या 6 नव्या टेकड्यांवर ताबा मिळवला आहे. विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिल्याचं वृत्त ANIने दिलं आहे. लडाखच्या पूर्व भागातल्या या टेकड्या असून उंचावर असल्याने चिनी लष्करावर अंकूश ठेवणं सोपं जाणार आहे.
या टेकड्यांवर ताबा मिळविण्यासाठी चीनने हालचाली सुरू केल्या होत्या. हा डाव ओळखताच भारतीय सैन्याने तातडीने पावलं टाकत या टेकड्या ताब्यात घेतल्या आहेत. 29 ऑगस्ट पासून या कारवाईला सुरूवात झाली होती. 15 सप्टेंबरपर्यंत या टेकड्या ताब्यात घेतल्या गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.