पवारांच्या बारामतीत चाललंय तरी काय, ऐतिहासिक वास्तू रातोरात केली जमीनदोस्त

पवारांच्या बारामतीत चाललंय तरी काय, ऐतिहासिक वास्तू रातोरात केली जमीनदोस्त

माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार हे यावेळी राजकारणात देखील नव्हते. बारामती शहरात ठराविकच काही ऐतिहासिक वास्तुंचा समावेश होता.

  • Share this:

बारामती, 30 एप्रिल: बारामती शहरातील नगरपरिषदेची ऐतिहासिक समजली जाणारी स्वागत कमान रातोरात जमीनदोस्त करण्यात आल्यानं नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

बारामती नगरपरिषदेची 1865 साली स्थापना झाल्यानंतर तत्कालीन नगराध्यक्ष जयराम पांडुरंग सातव यांच्या कालावधीत या ऐतिहासिक स्वागत कमान उभारण्यात आली होती. तत्कालीन गोव्याचे मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर यांच्या हस्ते या कमानीचे उद्घाटन करण्यात आले होते.

हेही वाचा..राज्यपालांची 'काळी टोपी' येते घटनात्मक जबाबदारीच्या आड, काँग्रेस नेत्याची बोचरी

माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार हे यावेळी राजकारणात देखील नव्हते. बारामती शहरात ठराविकच काही ऐतिहासिक वास्तुंचा समावेश होता. त्यामध्ये या नगरपरिषदेच्या या स्वागत कमानीचा उल्लेख केला जाईचा. पवार यांनी राजकारणात प्रवेश केल्यानंतर चार वेळा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला. केंद्र सरकार मध्ये देखील त्यांनी मोठं मोठी पदे भुशवली. त्यामुळे बारामतीची वेगळी ओळख निर्माण झाली होती. इलेक्ट्रॉनिक मिडीया देखील याच कमानीसमोरून वृत्तांकन करत असायचा. परंतु रात्रीतच ही कमान जमीन धोस्त केल्याने नागरीकांत तिव्र संताप व्यक्त केला जात आहे.

याबाबत नगरसेवकांना विचारले असता, आम्हाला तर काहीच कल्पना नाही. आपण फोन केल्यावरच कळतेय. अशी माहिती त्यांनी दिली.

एका बाजूला कोरोनाच्या संसर्गाने थैमान घातले आसताना, बारामती पॅटर्नचा अवलंब केला जातोय. यामध्ये लॉकडाऊनच्या काळात नागरिक घराबाहेर न पडता प्रशासनास सहकार्य करत आहे. त्यामुळे बारामती कोरोना मुक्तीकडे वाटचाल सुरू आसताना. नगरपरिषदेची ही ऐतिहासिक वास्तु रात्रीतच पाडण्याची काय गरज होती. असा सवाल देखील नागरिक विचारत आहेत.

हेही वाचा..Ground Report: मालेगावात कोरोनाचं मोठं संकट, सरासरी तासभरात सापडताहेत 4 रुग्ण

बारामतीत आतापर्यंत शेतकरी पुतळा, तीन हत्ती चौक, व आता नगरपरिषदेची स्वागत कमानीवर हतोडा पडलाय.आपल्या शहरातील ऐतिहासिक वास्तुंचे जतन करण्याऐवजी त्या जमीनधोस्त केल्या जातात. याचीच खंत आहे.

संपादन- संदीप पारोळेकर

First published: April 30, 2020, 6:19 PM IST

ताज्या बातम्या