भांडून माहेरी गेल्याचं सहन झालं नाही, पतीने पत्नीच्या छातीवर झाडल्या गोळ्या!

सोबीर हा भांडण्यासाठी घरी आला आणि पूनमवर गोळीबार केला. पुनमच्या छातीवर गोळी लागली आणि ती गंभीर जखमी झाली.

News18 Lokmat | Updated On: Aug 23, 2019 06:15 PM IST

भांडून माहेरी गेल्याचं सहन झालं नाही, पतीने पत्नीच्या छातीवर झाडल्या गोळ्या!

हरियाणा, 23 ऑगस्ट : हल्ली गुन्हा होण्यासाठी कोणतंही कारण लागत नाही हे खरं. गुन्ह्याचा असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पत्नी माहेरी गेल्यामुळे पतीने रागात तिच्यावर गोळीबार केला आहे. यामध्ये पत्नी गंभीर जखमी झाली आहे. रागाच्या भरात पतीने गोळ्या झाड़ल्यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

महिलेला गोळी लागताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. मिळालेल्या माहितीनुसार जगदीश कॉलनीतील राहणाऱ्या पूनमचे काही वर्षापूर्वी सीसाई गावात राहणाऱ्या सोबीरशी लग्न झाले होते. दोघांमध्ये भांडण झाल्यामुळे पूनम माहेरी आली असल्याची माहिती तिच्या कुटुंबियांनी दिली. बुधवारी तिचा नवरा सोबीर हा घरी आला आणि दोघांमध्ये मारहाण झाली.

पोलिसांनी आरोपी पतीला घेतले ताब्यात

कुटुंबीयांनी सांगितलं की, सोबीर हा भांडण्यासाठी घरी आला आणि पूनमवर गोळीबार केला. पुनमच्या छातीवर गोळी लागली आणि ती गंभीर जखमी झाली. शहरात गोळीबार झाल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि सोबीरला ताब्यात घेतले. पूनमची प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी तिला अग्रोहा मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल केलं आहे. याप्रकरणी पोलीस आता अधिक तपास करत आहेत.

पुण्यात बलात्कार.. आरोपीच्या घरातच आईला विवस्त्र आढळली मुलगी

Loading...

पुण्यातील धानोरी परिसरात एका नराधमाने आठवीतल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. मी सांगेल तसं केलं नाही तर तुझ्या भावाला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देऊन आरोपीने मुलीवर बलात्कार केला. या प्रकरणी आरोपी धनंजय मारमिल्ले (वय-28) याच्याविरूद्ध बाल लैंगि अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार (पोस्का) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

इतर बातम्या - जेव्हा दाम्पत्याने PORN साईटवर पाहिला त्यांचाच अश्लील VIDEO आणि नंतर...!

आरोपीच्या घरात आईला विवस्त्र आढळली मुलगी

पीडीत मुलगी आई, वडील आणि भावासोबत धानोरीत राहते. आरोपी बुधवारी पीडितेच्य घरी आला. तेव्हा पीडिता घरात एकटीच होती. आरोपीने तिला धमकी दिली. मी सांगेल तसं केलं नाही तर तुझ्या भावाला जिवंत सोडणार नाही, असे त्याने मुलीला सांगितले. आरोपी पीडित मुलीला त्याच्या घरी घेऊन गेला. नंतर त्याने मुलीवर बलात्कार केला. यादरम्यान मुलीच्या मामाचे निधन झाल्याचा निरोप तिच्या आईला मिळाला. ती मुलीला शाळेत घेण्यासाठी गेली. पण मुलगी शाळेत आली नसल्याचे आईला समजले. त्यामुळे आई मुलीचा शोध घेत असताना मुलगी आरोपीच्या घरात विवस्त्र अवस्थेत रडताना आढळून आली. मुलीने तिच्या आईला आपबिती सांगितली. याप्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपीविरूद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपी धनंजय मारमिल्ले फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

इतर बातम्या - मेट्रोमध्ये तरुणीने केलं फोटोशूट, Video पाहून तुम्हीही पडाल प्रेमात!

VIDEO: उदयनराजेंच्या भाजप प्रवेशावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 23, 2019 06:15 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...