हिंगोलीत तब्बल 40 हजार झाडं चोरीला !

हिंगोलीत तब्बल 40 हजार झाडं चोरीला !

सेनगाव नगर पंचायत,पंचायत समिती,ग्राम पंचायत कार्यालय,तहसील कार्यालय सह अनेक कार्यालयांनी ही झाडं लावल्याचा अहवाल दिला होता.

  • Share this:

हिंगोली, 27 जून : रुपये चोरीला गेले, सोने चोरीला गेले, किंवा साहित्य चोरीला गेले अशा आशयाची तक्रार येत असल्याचे आपण ऐेकलं असेल पण हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात मागील वर्षी लावण्यात आलेले ४० हजार  झाड चोरीला गेले असल्याची आगळी वेगळी तक्रार शिव सेना उपजिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांनी केली आहे.

शतकोटी वृक्ष लागवड योजनेअंतर्गत मागील वर्षी हिंगोली जिल्ह्यात मागील वर्षी जवळपास लाखो झाड लावण्यात आल्या दावा करण्यात आला होता. यापैकी सेनगाव तालुक्यात सामाजिक वनीकरण आणि वन विभागाने विविध कार्यालयांना जवळपास ४०,००० रोपांचे वाटप केले होते.

सेनगाव नगर पंचायत,पंचायत समिती,ग्राम पंचायत कार्यालय,तहसील कार्यालय सह अनेक कार्यालयांनी ही झाडं  लावल्याचा अहवाल दिला होता. पण आता या रोपांचा शोध केला असता ही झाडं कुठेच आढळून आली नसल्याची तक्रार  शिवसेनेतर्फे पोलिसांना देण्यात आली आहे.

ही झाडं चोरीला गेली असून याप्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी संदेश देशमुख यांनी केलीये. झाडं चोरीला गेल्याची ही महाराष्ट्राची किंबहुना पहिलीच तक्रार असेल. या अनोख्या तक्रारीमुळे पोलीस सुद्धा बुचकळ्यात पडले आहे.

या तक्रारीमुळे सर्व शासकीय कार्यालयात खळबळ उडाली असून पुढील आठवड्यात शतकोटी वृक्ष लागवड योजनेची सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर ही तक्रार महत्वपूर्ण ठरत आहे. आता सेनगाव पोलीस यावर काय कारवाई करते याचे लक्ष लागलेले आहे.

First published: June 27, 2018, 9:09 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading