Home /News /news /

हत्या झालेल्या हिंदू महासभेच्या अध्यक्षांचे झाले होते 2 विवाह, समाजवादी पार्टीशी कनेक्शन

हत्या झालेल्या हिंदू महासभेच्या अध्यक्षांचे झाले होते 2 विवाह, समाजवादी पार्टीशी कनेक्शन

रणजित बच्चन हे समाजवादी पक्षाशी संबंधित होते. ते सपासाठी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करायचे. हेच कारण होते की, त्यांना हजरतगंजच्या पॉश ओसीआर इमारतीत राहण्यासाठी फ्लॅट देण्यात आला होता

    लखनऊ, 02 फेब्रुवारी : आंतरराष्ट्रीय हिंदू महासभेचे अध्यक्ष रणजित बच्चन (Ranjeet Bachchan) यांच्या हत्येनंतर सगळीकडे खळबळ उडाली आहे. लखनऊमध्ये कमिशनिंग सिस्टम लागू झाल्यानंतर ही पहिली धक्कादायक घटना आहे. तर पोलीस हत्येचे कारण शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत. या हत्येनंतर आता पोलीस तपासात अनेक खुलासेही समोर येत आहेत. रणजित बच्चन हे समाजवादी पक्षाशी संबंधित होते. ते सपासाठी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करायचे. हेच कारण होते की, त्यांना हजरतगंजच्या पॉश ओसीआर इमारतीत राहण्यासाठी फ्लॅट देण्यात आला होता. रणजित बच्चन यांनी दोन विवाह केल्याचे सांगण्यात येत आहे. पहिल्या पत्नीबरोबरचे त्याचे संबंध काही कारणास्तव बिघडले. याच प्रकरणात रणजित बच्चन यांच्याविरोधात गोरखपूरमध्ये कौटुंबिक वादासंदर्भात एफआयआर नोंदविण्यात आला आहे. त्यामुळे पोलीस प्रत्येक बाजून या प्रकरणाचा तपास करत आहेत. तपासासाठी चार पथकांची केली स्थापना या हत्येच्या चौकशीसाठी लखनऊचे पोलीस आयुक्त सुजित पांडे यांनी चार पथके तयार केली आहेत. एक टीम त्यांच्या पक्षाशी संबंधित कामाची चौकशी करत आहे. दुसरी टीम त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटची चौकशी करत आहे. या व्यतिरिक्त दोन संघ त्यांच्या कुटूंबातील सदस्य व कुटुंबातील सदस्यांशी संपर्क साधून माहिती एकत्रित करण्यात गुंतले आहेत. इतर बातम्या - भाजपच्या माजी मंत्र्यांची जीभ घसरली, महिला तहसिलदाराचा केला आक्षेपार्ह उल्लेख कमलेश तिवारी खून प्रकरणाशी संबंधित तपास सुरू दुसरीकडे, हिंदूवादी नेते कमलेश तिवारी हत्येच्या खटल्याशी संबंध जोडत पोलिसही या प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिसांनी बरेलीचे डीआयजी राजेश पांडे यांनाही संपर्क साधला असून तपासात सहकार्य करण्यास सांगितले आहे. कमलेश तिवारी हत्येप्रकरणी तीन आरोपी नांगरट्यात जामिनावर सुटल्यानंतर नुकतेच तुरूंगातून बाहेर आले आहेत. बरेली पोलिसांना या तिघांचीही चौकशी करण्यास सांगण्यात आले आहे. इतर बातम्या - महाराष्ट्रात CAA कायदा लागू होणार नाही, उद्धव ठाकरेंचं मोठं विधान मॉर्निंग वॉकला गेले असता झाली हत्या ही घटना सकाळी 6 वाजताच्या सुमारास घडल्याचं सांगण्यात येत आहे. रणजित बच्चन त्यांच्या मित्र आशिष श्रीवास्तवसोबत मॉर्निंग वॉकला गेले होते. जेव्हा ते ग्लोब पार्कपासून पुढे निघत होते तेव्हा काही दुचाकीस्वार आले आणि त्यांनी थेट बच्चन यांच्या डोक्यात गोळ्या झाडल्या. या घटनेमध्ये आशिष श्रीवास्तवदेखील जखमी झाले ज्यांच्यावर ट्रामा रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्येचे अद्याप कोणतेही कारण समोर आले नसून पोलीस संपूर्ण प्रकरणाचा कसून तपास करत आहे. यावेळी पोलीस आयुक्तांसह उच्च अधिकारी उपस्थित होते. गेल्या वर्षी हिंदुवादी नेते कमलेश तिवारी यांनाही त्यांच्याच घरात घुसून ठार मारण्यात आले होते. त्यामुळे रणजित बच्चन यांच्या हत्येबाबत आता बरेच प्रश्न उपस्थित होत आहेत. इतर बातम्या - निर्दयी! भर चौकात केला पत्नीचा खून, हातात कापलेले शीर घेऊन निघाला चालत
    Published by:Renuka Dhaybar
    First published:

    पुढील बातम्या