मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

'फॅमिली मॅन 2' साठी 'या' कलाकारांना मिळालंय इतकं मानधन; ऐकून व्हाल थक्क

'फॅमिली मॅन 2' साठी 'या' कलाकारांना मिळालंय इतकं मानधन; ऐकून व्हाल थक्क

फॅमिली मॅन 2 (Family Man 2) या सिरीजची सध्या जोरात चर्चा  सुरु आहे.

फॅमिली मॅन 2 (Family Man 2) या सिरीजची सध्या जोरात चर्चा सुरु आहे.

फॅमिली मॅन 2 (Family Man 2) या सिरीजची सध्या जोरात चर्चा सुरु आहे.

मुंबई, 9 जून-  एखाद्या चित्रपट किंवा वेबसिरीजसाठी बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेते (Actor) आणि अभिनेत्री (Actress) किती मानधन (Payment) घेत असतील, त्यांना किती पैसा मिळत असेल असा उत्सुकतेचा प्रश्न अनेकांच्या मनात नेहमीच येतो. या अभिनेत्याने या चित्रपटासाठी इतके कोटी मानधन घेतले, या अभिनेत्रीने इतके कोटी मानधन घेतले, असे आपण नेहमीच वाचत आणि ऐकत असतो. अनेकदा या मानधनाचे आकडे सर्वसामान्य लोकांचे डोळे विस्फारुन टाकणारे असतात.

इतक्या पैशाचे हे लोक काय करत असतील असा अगदी सुलभ प्रश्न देखील अनेकांच्या मनात येतो. असे असले तरी कलाकारांचे मानधन जाणून घेण्याची उत्सुकता मात्र कमी होत नाही. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चित्रपटगृहे बंद आहेत. त्यामुळे अनेक बड्या कलाकारांनी ओटीटी प्लॅटफॉर्मचा (OTT Platform) पर्याय निवडला आहे. अनेक बडे कलाकार त्यांचे चित्रपट या प्लॅटफॉर्मवर रिलीज करत आहेत. काही कलाकारांनी वेबसिरीजचा पर्याय निवडला आहे. अशीच एक वेबसिरीज सध्या जोरदार चर्चेत आहे. आशय, मांडणी, कथानक तसेच कलाकारांचे मानधन यामुळे फॅमिली मॅन 2 (Family Man 2) या सिरीजची चर्चा जोरात सुरु आहे.

(हे वाचा:लॉरेनच्या हॉट लुकची होतेय चर्चा; VIRAL झाला BIKINI PHOTOSHOOT  )

फॅमिन मॅन सिरीजचा पहिला सिझन जोरदार हिट झाला होता आणि आता फॅमिली मॅन 2 या सिझनने देखील प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आहे. या सिरीज मध्ये राजीची भूमिका साकारणारी अभिनेत्री समांथा अक्किनेनीने (Samantha Akkineni) सोशल मिडीयावर नुकतेच शेअर केले की या सिरीजमधील सर्व स्टंट तिने स्वतः केले असून यासाठी यॉनिक बेन यांनी तिला प्रशिक्षण दिले. या स्टंट मुळे तिची खूपच प्रशंसा झाली.

(हे वाचा:आमिरचा मुलगा बॉलिवूडमध्ये यायला सज्ज; Unlock नंतर 'महाराजा'चं शूट सुरु  )

आता या सिरीजमधील मुख्य कलाकारांच्या मानधनाचे आकडे समोर आले आहेत. एका अहवालानुसार, या सिरीजमध्ये श्रीकांत तिवारी ही भूमिका साकारणारे प्रसिद्ध अभिनेते मनोज वाजपेयी (Manoj Bajpayee) यांनी या सिझनसाठी 10 कोटी रुपये मानधन घेतलं आहे. दरम्यान, या फ्रॅन्चायझीमध्ये नव्याने प्रवेश करणाऱ्या समांथाने या भूमिकेसाठी 3 ते 4 कोटी रुपये मानधन घेतलं आहे. श्रीकांत तिवारी याची पत्नी सुचीच्या भूमिकेसाठी प्रियामणी (Priyamani) यांना चर्चेनुसार 80 लाख रुपये देण्यात आले आहेत. जेके ही भूमिका साकारणाऱ्या शरीब हाश्मीला 65 लाख, मेजर समीर ही भूमिका करणाऱ्या दर्शन कुमार या अभिनेत्याला 1 कोटी, धरित्री हे पात्र साकारणाऱ्या आश्लेषा ठाकूरला 50 लाख, अरविंदच्या भूमिकेसाठी शरद केळकरला 1.6 कोटी तर मिलींदची भूमिका साकारणाऱ्या सनी हिंदूजा यास 60 लाख रुपये मानधन देण्यात आल्याची माहिती संबंधित सूत्रांकडून मिळाली आहे.

First published: