हिमांशू रॉय यांचा कॅन्सर पूर्ण बरा झाला होता, डॉक्टरांचा दावा

हिमांशू रॉय यांचा कॅन्सर पूर्ण बरा झाला होता, डॉक्टरांचा दावा

अतिरिक्त पोलीस आयुक्त हिमांशू रॉय यांचा कॅन्सर पूर्ण बरा झाला होता अशी माहिती कॅन्सर तज्ज्ञ डॉ. राम नगरकर यांनी दिली. न्यूज18 लोकमतच्या बेधडक कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

  • Share this:

मुंबई,ता.11,मे: अतिरिक्त पोलीस आयुक्त हिमांशू रॉय यांचा कॅन्सर पूर्ण बरा झाला होता अशी माहिती कॅन्सर तज्ज्ञ डॉ. राम नगरकर यांनी दिली. न्यूज18 लोकमतच्या बेधडक कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही माहिती दिली. रॉय यांच्या उपचारात डॉ.नगरकर सहभागी होते. काही दिवसांपूर्वीच त्यांचे रिपोर्टर्स आले होते त्यात कॅन्सर पूर्ण बरा झाल्याचं आढळलं होतं. असं असतानाही त्यांनी केवळ निराशेतून आत्महत्या केली असावी असंही ते म्हणाले.

गेल्या दोन वर्षांपासून त्यांच्यावर कॅन्सरचे उपचार सुरू होते. सततच्या उपचारामुळं त्यांची प्रकृती ढासळली होती. हेवा वाटावा अशी शरिरयष्टी, ग्लॅमर आणि खाकी वर्दीची सवय झालेल्या रॉय यांना हे सर्वच जवळ नसणं खूप लागलं असावं आणि त्यातूनच हे टोकाचं पाऊल त्यांनी उचललं असावं असंही ते म्हणाले.

First published: May 11, 2018, 6:46 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading