हिमाचल प्रदेशात विधानसभेसाठी सरासरी 74 टक्के मतदान

हिमाचल प्रदेशात आज 68 जागांसाठी सरासरी 74 टक्के मतदान झालं. या निवडणुकीत भाजप - काँग्रेस थेट आमनेसामने आहेत. सकाळी आठ ते पाच या वेळेत शांततापूर्ण वातावरणात हे मतदान पार पडलं. 68 जागांसाठी एकूण 60 विद्यमान आमदारांसह 337 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते.

Chandrakant Funde | News18 Lokmat | Updated On: Nov 9, 2017 10:10 PM IST

हिमाचल प्रदेशात विधानसभेसाठी सरासरी 74 टक्के मतदान

सिमला, 09 नोव्हेंबर : हिमाचल प्रदेशात आज 68 जागांसाठी सरासरी 74 टक्के मतदान झालं. या निवडणुकीत भाजप - काँग्रेस थेट आमनेसामने आहेत. सकाळी आठ ते पाच या वेळेत शांततापूर्ण वातावरणात हे मतदान पार पडलं. 68 जागांसाठी एकूण 60 विद्यमान आमदारांसह 337 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. 7 हजार 525 मतदान केंद्रांवर मतदान झालं त्यासाठी 17 हजार 850 पोलीस कर्मचारी तैनात होते.

काँग्रेसचे मावळते मुख्यमंत्री वीरभ्रद्र सिंग या निवडणुकीतही आपला करिष्मा कायम राखणार की लोक भाजपच्या हाती सत्ता देणार हे आता मतमोजणीच्या दिवशीच कळणार आहे. 18 डिसेंबरला इथली मजमोजणी होणार आहे. भाजपने ही निवडणूक भ्रष्टाचाराच्या मुद्यावर तर काँग्रेसने नोटबंदी आणि जीएसटीच्या मुद्यावर लढवली.

हिमाचलमध्ये आजपर्यंत एकही पक्ष सलग दोनदा सत्तेत आला नाही. त्यामुळे यावेळी तरी काँग्रेस आपली सत्ता टिकवते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. काँग्रेसने या निवडणुकीची जबाबदारी माजी केंद्रीयमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यावर सोपवली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 9, 2017 10:10 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...