हिमाचल प्रदेशात '#ExitPoll'ची पसंती भाजपलाच !

हिमाचल प्रदेशात '#ExitPoll'ची पसंती भाजपलाच !

हिमाचल प्रदेश विधानसभा 2017साठीचे एक्झिट पोल जाहीर झालेत. विधानसभेच्या 68 जागांसाठी तिथं मतदान झालंय. बहुतांश सर्वेमध्ये तिथं भाजपच सत्तेवर येणार असल्याचा अंदाज व्यक्त केला गेलाय. जवळपास सर्वच सर्वेमधून भाजपला 45ते 55 तर काँग्रेसला 13 ते 25 च्या आसपासच जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आलाय.

  • Share this:

14 डिसेंबर, नवी दिल्ली : हिमाचल प्रदेश विधानसभा 2017साठीचे एक्झिट पोल जाहीर झालेत. विधानसभेच्या 68 जागांसाठी तिथं मतदान झालंय. बहुतांश सर्वेमध्ये तिथं भाजपच सत्तेवर येणार असल्याचा अंदाज व्यक्त केला गेलाय. जवळपास सर्वच सर्वेमधून भाजपला 45ते 55 तर काँग्रेसला 13 ते 25 च्या आसपासच जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आलाय. हिमाचल प्रदेशात सध्या काँग्रेसचं सरकार आहे. गेल्या निवडणुकीत तिथं काँग्रेसला 36 तर भाजपला 26 जागा मिळाल्या होत्या. हिमाचल प्रदेशातील गेल्या काही निवडणुकांमधील कल तपासले तर तिथली जनता शक्यतो विद्यमान सरकारला दुसऱ्यांदा संधी देत नाही, त्या न्यायानुसारच यंदा बहुतांश सर्वेमधून भाजपलाच सत्ता मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेत. हिमाचल प्रदेशात यावेळी 75 टक्के मतदान झालंय. तर गेल्या निवडणुकीत 73. 51 टक्के मतदान झालं होतं. 1985 सालापासून इथं एकदाही सत्ताधारी पक्षाला सलग दुसऱ्यांदा सत्ता मिळालेली नाही. त्यामुळे यावेळी तिथं भाजपच जिंकेल, अशी शक्यता वर्तवली जातेय.

हिमाचल प्रदेश 2017 एक्झिट पोल (एकूण -68)

सर्वे                                      भाजप             काँग्रेस              इतर

टाईम्स नाऊ व्हिएमआर        51                16                     01

आजतक एक्सिस                  47-55          13-20              06

सहारा समय                         42-52         18-24               02

रिपब्लिक सी वोटर               41                 25                    02

न्यूज 24 चाणक्य                  55                13                     00

First published: December 14, 2017, 7:06 PM IST
Tags:

ताज्या बातम्या