दारूची दुकानं 500 मिटरच्या आत आहेत की नाही मोजून घ्या, कोर्टाचे आदेश

महामार्गानजिक मद्यविक्रीपेक्षा अपघातांना आळा घालणं जास्त महत्त्वाचं असल्याचं परखड मतंही यावेळी हायकोर्टानं नोंदवलं

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jun 12, 2017 08:18 PM IST

दारूची दुकानं 500 मिटरच्या आत आहेत की नाही मोजून घ्या, कोर्टाचे आदेश

12 जून : महामार्गापासून असलेले बार किंवा दारुची दुकानं ही  ५०० मिटरच्या अंतरावर आहेत की नाहीत हे तिथलं अंतर मोजून ५ जुलैपर्यंत निर्णय घ्या असा आदेश मुंबई हायकोर्टानं राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांना दिले आहेत.

सुप्रीम कोर्टाने हायवेलगत 500 मिटरच्या आत असलेल्या दारू विक्रीला बंदी घातलीये. या निर्णयाची कडक अंमलबाजवणी सुद्धा झालीये. मात्र, सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन राज्य सरकार चुकीच्या पद्धतीने करत असल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला होता. यावर हायकोर्टाने हायवेलगत ५०० मिटरच्या अंतरावर आहेत की नाहीत हे तिथलं अंतर मोजून ५ जुलैपर्यंत निर्णय घ्या असा आदेश मुंबई हायकोर्टाने दिले.

तसंच महामार्गानजिक मद्यविक्रीपेक्षा अपघातांना आळा घालणं जास्त महत्त्वाचं असल्याचं परखड मतंही यावेळी हायकोर्टानं नोंदवलं आहे.

या आदेशासोबतच हायकोर्टाने या संदर्भात आलेल्या सगळ्या याचिका निकाली काढल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 12, 2017 08:18 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...