हायकोर्टाने डीएसकेंचा अंतरिम जामीन फेटाळला, कोणत्याही क्षणी अटक

हायकोर्टाने डीएसकेंचा अंतरिम जामीन फेटाळला, कोणत्याही क्षणी अटक

मुंबई हायकोर्टाने अखेर डिएसकेंना दिलेलं अंतरिम जामिनाचं कायगेशीर संरक्षण काढून घेतल्याने, पुणे पोलीस त्यांना कोणत्याही क्षणी अटक करू शकतात. मुंबई हायकोर्टाने डीएसकेंचा अटकपूर्व जामीन फेटाळताना गुंतवणूकदारांची जाहीर माफीही मागितलीय

  • Share this:

16 फेब्रुवारी, मुंबई/पुणे : मुंबई हायकोर्टाने अखेर डिएसकेंना दिलेलं अंतरिम जामिनाचं कायगेशीर संरक्षण काढून घेतल्याने, पुणे पोलीस त्यांना कोणत्याही क्षणी अटक करू शकतात. मुंबई हायकोर्टाने डीएसकेंचा अटकपूर्व जामीन फेटाळताना गुंतवणूकदारांची जाहीर माफीही मागितलीय. गुंतवणूकदारांचे पैसे देण्यासाठी आम्ही देण्यासाठी आम्ही आजवर डीएसकेंना भरपूर दिवसांची सवलत दिली, पण तुम्ही कोर्टाशी खोटं बोलले, तुम्ही कोर्टाला फसवलं, आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवला, फक्त गुंतवणूकदारांसाठी, पण तुम्ही आम्हालाच फसवलं, अशा कठोर शब्दात हायकोर्टाने डीएसकेंना आजच्या सुनावणी दरम्यान फटकारलं.

दरम्यान, डीएसकेंचा अंतरिम जामीन हायकोर्टाने नामंजूर केला असला तरी त्यांच्या जामिनावर पुढच्या 1 मार्चला अंतिम सुनावणी होणार आहे. पण तरीही कोर्टाने डीएसकेंचा अंतरिम जामीन फेटाळल्याने पुणे पोलीस त्यांना आता कोणत्याही क्षणी अटक करू शकतात. या सुनावणीदरम्यान, हायकोर्टाने पासपोर्टही जप्त करण्याचे निर्देश दिलेत. त्यावर डीएसकेंच्या वतीने आपण यापूर्वीच पासपोर्ट पोलिसांकडे जमा केल्याचं सांगण्यात आलं. पण तरीही कोर्टाने त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही, डीएसकेंकडे कदाचित दोन पासपोर्ट देखील असू शकतात, अशा शब्दात कोर्टाने डीएसकेंना सुनावत आपला तुमच्यावर आता अजिबात विश्वास नसल्याचं स्पष्ट केलं.

First published: February 16, 2018, 2:32 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading