नागपूरातील परीक्षा केंद्रावरील हायटेक कॉपी रॅकेटचा भांडाफोड; ब्लुटूथ, टॅबच्या मदतीने सुरू होता प्रकार
नागपूरातील परीक्षा केंद्रावरील हायटेक कॉपी रॅकेटचा भांडाफोड; ब्लुटूथ, टॅबच्या मदतीने सुरू होता प्रकार
Board exam
डमी परीक्षार्थी टॅबच्या कॅमेऱ्यासाठी छिद्र असलेली विशेष टीशर्ट घालून परीक्षा केंद्रावर जात होतेडमी परीक्षार्थी टॅबच्या कॅमेऱ्यासाठी छिद्र असलेली विशेष टीशर्ट घालून परीक्षा केंद्रावर जात होते
तुषार काहोळे/ वर्धा, 4 मार्च : नागपूर पोलिसांनी आज अत्यंत हायटेक पद्धतीनं कॉपी करून परीक्षार्थींना टॉप करून देणाऱ्या एका रॅकेटचा भांडाफोड केला आहे. रॅकेटचे सदस्य ब्लुटूथ व टॅबच्या मदतीने परीक्षा केंद्रातील आत असलेल्या डमी उमेदवाराला परीक्षा केंद्राच्या बाहेरून संपर्क साधायचे व तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रश्न पत्रिकेतील प्रश्नांची उत्तरं सांगत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. परीक्षेत टॉप करण्याच्या बदल्यात ते एका उमेदवाराकडून चार ते पाच लाख उकळत असे. या प्रकरणात आतापर्यंत सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे.
एखाद्या हॉलिवूड चित्रपटाच्या कथानकाप्रमाणे नागपूरचं परीक्षा रॅलेट सुरू होतं. या रॅकेटचा सूत्रधार प्रेमसिंग राजपूत हा केंद्र सरकारच्या रस्ते व परिवहन विभागात चतुर्थ श्रेणी कर्मचारी आहे. महाराष्ट्र शासनाच्या पणन वस्त्रोउद्योग विभागाच्यावतीने सह निबंधक सहकारी संस्था या पदाकरिता परीक्षा घेतल्या होत्या. यातील परीक्षार्थी इंद्रजित बोरकर याने 200 पैकी 178 गुण प्राप्त करत टॉप केले होते. कागदपत्राची पडताडणी करताना परीक्षेच्या वेळी केलेली स्वाक्षरी आणि मूळ साक्षरी यात तफावत दिसून आल्या नंतर संशय आला. पोलिसांना माहिती दिल्यानंतर या रॅकेटचे बिंग फुटले. विशेष म्हणजे परीक्षार्थीच्या वडिलांनी या रॅकेटशी संपर्क साधून आपल्या मुलाला साडेचार लाखात पास करण्याच्या हमीवर व्यवहार केला हे मूळ परीक्षार्थी असलेल्या मुलाला माहीतच नव्हते.
हे ही वाचा-सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे पाच जिल्ह्यातील जिल्हा परिषद सदस्यांवर परिणाम
रॅकेटचे सदस्य युट्यूब व टॅबच्या मदतीने परीक्षा केंद्रात गेलेल्या डमी उमेदवाराला परीक्षा केंद्राच्या बाहेरून संपर्क साधायचे व तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रश्न पत्रिकेतील प्रश्नांची उत्तरे देत होते. यासाठी डमी परीक्षार्थी टॅबच्या कॅमेऱ्यासाठी छिद्र असलेली विशेष टीशर्ट घालून परीक्षा केंद्रावर जात होते व एकदा कानात ब्लूटूथ लावायचे. हे कारनामे करून हे रॅकेट परीक्षार्थीला टॉप करून देत असे. रविवारला आरोग्य विभागाच्या परीक्षेदरम्यान रॅकेटचे सदस्य प्रतापसिंग दुलहट हा एका परीक्षार्थीसाठी परिषकेंद्राच्या बाहेरून परीक्षा देत असतांना त्याला रंगेहात अटक केली.
आता पर्यंत या प्रकरणात 6 जणांना अटक करण्यात आली असून यांनी या आधी या रॅकेटच्या सदस्यांनी किती परीक्षार्थींसाठी परीक्षा दिल्या याचा शोध नागपूर पोलीस घेत आहे.
Published by:Manoj Khandekar
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.