News18 Lokmat

रस्त्यांवरील खड्डे अपघातप्रकरणी यापुढे कंत्राटदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नको- हायकोर्ट

खराब झालेल्या रस्त्याची दुरुस्ती केली नसल्यामुळे अपघात होऊन कोणाचा मृत्यू झाला असल्यास त्याकरता कंत्राटदाराविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करता येणार नसल्याचा महत्त्वाचा निर्णय मुंबई हायकोर्टानं दिला आहे. या निर्णयामुळे या प्रकरणातील याचिकाकर्ते असलेल्या सायन-पनवेल टोलवेज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला मोठा दिलासा मिळाला आहे.

Chandrakant Funde | News18 Lokmat | Updated On: Nov 22, 2017 08:06 PM IST

रस्त्यांवरील खड्डे अपघातप्रकरणी यापुढे कंत्राटदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नको- हायकोर्ट

विवेक कुलकर्णी, प्रतिनिधी

22 नोव्हेंबर, मुंबई : खराब झालेल्या रस्त्याची दुरुस्ती केली नसल्यामुळे अपघात होऊन कोणाचा मृत्यू झाला असल्यास त्याकरता कंत्राटदाराविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करता येणार नसल्याचा महत्त्वाचा निर्णय मुंबई हायकोर्टानं दिला आहे. या निर्णयामुळे या प्रकरणातील याचिकाकर्ते असलेल्या सायन-पनवेल टोलवेज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला मोठा दिलासा मिळाला आहे.

या वर्षी ४ जुलैला उरण फाटा पुलाजवळ दोन ट्रक, दोन पिक टेम्पो आणि एका मोटरसायकलचा अपघात झाला होता. यात अनेक जण जखमी झाले होते. वाहनांचा वेग कमी असूनही मान्सूनपूर्व रस्ता दुरुस्तीचं कामं नीट न झाल्यानंच हा अपघात झाल्याचा ठपका ठेवत कंत्राटदाराविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्याविरोधात सायन पनवेल टोलवेज प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष पवनीत सिंग सेठी, उपाध्यक्ष विभुदात सतपती, सीनिअर मॅनेजर रमझान पटेल आणि अधिकारी संजीव श्रीवास्तव यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती.

या रस्त्यावर पूर्वीही अपघात झाले होते आणि काही जणांना आपले प्राण गमवावे लागले असाही मुद्दा या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान मांडण्यात आला होता. पण झालेले अपघात हेतुपुरस्सर करण्यात आले नव्हते असं मत कोर्टाने नोंदवलं. तसंच ज्या पाच वाहनांच्या अपघात प्रकरणात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्यात आला त्यात अपघात ट्रक चालकाच्या चुकीनं झाला असं म्हणण्यात असल्याचं कोर्टाने मत नोंदवत रस्ता कंत्राटदाराविरुद्धचा सदोष मनुष्यवधाचा एफआयआर रद्द करण्याचा आदेश दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 22, 2017 06:32 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...