• Home
  • »
  • News
  • »
  • news
  • »
  • एमपीएससीच्या भर्ती प्रक्रियेवर हायकोर्टाची स्थगिती आठवड्याभरासाठी कायम

एमपीएससीच्या भर्ती प्रक्रियेवर हायकोर्टाची स्थगिती आठवड्याभरासाठी कायम

MPSCच्या निवड प्रक्रियेवर मुंबई हायकोर्टानं अजून एक आठवड्यासाठी स्थगिती कायम ठेवली आहे. आजच्या सुनावणी दरम्यान सरकारी वकील गैरहजर असल्यानं सुनावणी एका आठवड्यासाठी तहकूब करण्यात आली आहे.

  • Share this:
15 फेब्रुवारी, मुंबई : MPSCच्या निवड प्रक्रियेवर मुंबई हायकोर्टानं अजून एक आठवड्यासाठी स्थगिती कायम ठेवली आहे. आजच्या सुनावणी दरम्यान सरकारी वकील गैरहजर असल्यानं सुनावणी एका आठवड्यासाठी तहकूब करण्यात आली आहे. आरक्षित कोट्यातील उमेदवारांना खुल्या वर्गातून अर्ज दाखल केल्याच्या कारणावरून अपात्र ठरवलं जात असल्याचा आरोप करत अजय मुंडे यांनी यांनी हायकोर्टात जनहित याचिका दाखल केलीय. मागसवर्गीय कोट्यातल्या विद्यार्थ्यानं गुणवत्तेच्या आधारवर महिला खुला वर्ग अथवा खुला वर्ग स्पोर्ट्स कोट्यातून अर्ज दाखल केला असेल तर त्याल्या प्रवेश प्रक्रियेच्या एखाद्या टप्यावर खुल्या वर्गातून अर्ज केल्याच्या कारणावरून अपात्र ठरवलं जातंय, ही बाब या याचिकेतून हायकोर्टाच्या निर्दशनास आणून देण्यात आली आहे. त्यानंतर हायकोर्टाने एमपीएससीच्या भर्ती प्रक्रियेलाच स्थगिती दिलीय.
First published: