लोढा ग्रुपला ठोठावण्यात आलेल्या 474 कोटींच्या दंडाला स्थगिती

लोढा ग्रुपला ठोठावण्यात आलेल्या 474 कोटींच्या दंडाला स्थगिती

  • Share this:

मुंबईतील वडाळा इथल्या 5 हजार 700 कोटी  रुपयांच्या जमीनीच्या व्यवहाराची स्टॅप ड्यूटी जाणूनबुजून चुकवल्या प्रकरणी  राज्य सरकारच्या स्टॅप आणि रजिस्ट्रेशन विभागानं लोढा ग्रुपला 474 कोटींचा दंड ठोठावला. या आदेशाला हाय कोर्टाने काल (गुरुवारी) स्थगिती दिली असली  लोढा ग्रुपला स्टॅप आणि रजिस्ट्रेशन विभागाच्या निर्णयाविरोधात 60 दिवसांच्या आत अपील करण्याचे आदेश दिलेत,' अशी माहिती लोढा समूहाच्या वतीने देण्यात आली.

लोढा ग्रुपमार्फत मुंबईतील नव्याने विकसित होत असलेल्या वडाळा भागातील 'न्यू कफ परेड' हा प्रकल्प राबवला जात आहे. या जमीनीच्या व्यवहाराचीस्टॅप ड्यूटी जाणूनबुजून चुकवल्या प्रकरणी  राज्य सरकारच्या स्टॅप आणि रजिस्ट्रेशन विभागानं लोढा ग्रुपला 474 कोटींचा दंड ठोठावला आहे. हा दंड 30 दिवसांच्या आत जमा करण्याचा आदेशही दिला आहे. या आदेशानुसार, दंडाची रक्कम न भरल्यास पुढील कारवाई करण्यात येईल.

दक्षिण मुंबईतील भाजपचे आमदार मंगलप्रभात लोढा यांच्या या ग्रुपला सरकारने दंड केल्याने एकच खळबळ उडाली आहे. मात्र, लोढा ग्रुपने लगेचच या नोटिसीला हायकोर्टात आव्हान दिलं आणि गुरुवारी कोर्टाने दंड आकारणीस स्थगितीही दिली आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 5, 2017 04:59 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...