हाय अलर्ट! भारत-ऑस्ट्रेलिया टी20 सामन्याला कडक सुरक्षा व्यवस्था

हाय अलर्ट! भारत-ऑस्ट्रेलिया टी20 सामन्याला कडक सुरक्षा व्यवस्था

दोन टी20 सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने 1-0 अशी आघाडी घेतल्याने भारतीय संघाला हा सामना जिंकावा लागेल.

  • Share this:

बेंगळुरू, 27 फेब्रुवारी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या दोन टी20 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना आज बेंगलुरू येथील चेन्नास्वामी स्टेडिअमवर खेळला जाणार आहे. या सामन्यावेळी हाय अलर्ट जारी करण्यात आला असून भारत पाक सीमेवरील तणावामुळे सामन्यावेळी घातपात होऊ नये यामुळे पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

पुलवामात सीआरपीएफ जवानांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवादी संघटनेचा प्रशिक्षण तळ भारताच्या हवाई दलाने उद्ध्वस्त केला. त्यानंतर पाकिस्तानने सीमेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. यामुळे भारत-पाक सीमेवरील वातावरण तणावपूर्ण बनले असून देशात सर्वत्र हाय अलर्ट देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर होत असलेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी 20 सामन्यात घातपात होऊ नये यासाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमार स्वामी यांनी पोलिस प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

भारत ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला सामना शेवटच्या चेंडूवर ऑस्ट्रेलियाने जिंकला. भारताने दिलेल्या 126 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने 7 बाद 127 धावा केल्या. शेवटच्या षटकात ऑस्ट्रेलियाला 14 धावांची गरज होती. सलामीचे आणि मधल्या फळीतले फलंदाज बाद झाल्यानंतर तळाच्या फलंदाजांनी चमकदार कामगिरी करत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला.

भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल, शिखर धवन, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, महेंद्र सिंग धोनी, कृणाल पंड्या, विजय शंकर, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, उमेश यादव, सिद्धार्थ कौल आणि मयंक मार्कंडेय.

ऑस्ट्रेलिया : एरॉन फिंच (कर्णधार), डार्सी शॉर्ट, पेंट कमिन्स, अॅलेक्स कॅरी, जेसन बेहरेनडोर्फ, नाथन कूल्‍टर नाइल, पीटर हॅण्डसकॉम्ब, उस्मान ख्वाजा, नाथन लियॉन, ग्लेन मैक्सवेल, झाय रिचर्डसन, केन रिचर्डसन, मार्कस स्टोइनिस, अॅश्टन टर्नर आणि अॅडम जम्पा.

First published: February 27, 2019, 4:59 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading