Hero ने लाँच केली नवी स्कुटर; 'ही' आहेत फीचर्स आणि किंमत

Hero ने लाँच केली नवी स्कुटर; 'ही' आहेत फीचर्स आणि किंमत

Heroची ही स्कुटर टीवीएस एनटॉर्क आणि होंडा ग्राजिया या दोन स्कुटर्सना देणार टक्कर

  • Share this:

नवी दिल्ली, 18 मे : देशतील सर्वात मोठी 2-व्हीलर कंपनी हीरो मोटोकॉर्प (Hero MotoCorp) ने Hero Maestro Edge 125 ही स्कुटर लाँच केली आहे. ही नवी स्कुटर कार्बोरेटर ड्रम ब्रेक, कार्बोरेटर डिस्क ब्रेक आणि फ्युल इन्जेक्टेड अशा तीन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. या तिन्ही व्हेरिएंटची एक्स शोरूम किंमत अनुक्रमे 58,500 रुपये, 60,000 रुपये आणि 62,700 रुपये अशी आहे. Heroची ही स्कुटर टीवीएस एनटॉर्क आणि होंडा ग्राजिया या दोन स्कुटर्सना टक्कर देणार असा दावा कंपनीने  केला आहे. बुकिंग प्रक्रिया सुरू झाली असून या महिन्याच्या अखेरीस डिलीवरी सुरू होईल अशी माहिती आहे.

पहिल्यांदाच धावणार ड्रायव्हरलेस ट्रक; 'ही' आहेत फीचर्स

Hero Maestro Edge 125 ही स्कुटर दिसायला 'स्टाइलिंग ऑटो एक्सपो-2018' मध्ये सादर करण्यात आलेल्या मास्ट्रो एज सारखी आहे. युवा पिढीला डोळ्यासमोर ठेऊन कंपनीने ही स्कुटर डिझाइन केली आहे. यात एक्सटर्नल फ्युल-फिल्टर कॅप आणि डिजिटल एनालॉग इंस्ट्रुमेंट क्लस्टर आहे. तसंच साइड स्टँड आणि सर्व्हिस इंडिकेटरची सुविधा दिली आहे.

7.70 लाखांची मेक इन इंडिया Honda CBR650R बाइक लाँच, 'ही' आहेत फीचर्स

अशी आहेत फीचर्स -

- हीरोने आपल्या या नव्या स्कुटरमध्येसुद्धा Destini 125 सारखं 125cc इंजिन लावलं आहे.

- हिरोचं मास्ट्रो एज 125चं फ्युल इन्जेक्टेड व्हेरिएंट हे देशातलं पहिलं फ्युल इन्जेक्टेड मॉडेल आहे.

- या व्हेरिएंटमधलं इंजिन 7,000rpm वर 9.2hp ची पावर जनरेट करतं तर 5,000rpm वर 10.2Nm चा पीक टॉर्क जनरेट करतं.

- कार्बोरेटर व्हेरिएंटमधलं इंजिन 6,750rpm वर 8.83hp ची पावर जनरेट करतं तर 5,000rpm वर 10.2Nm पीक टॉर्क जनरेट करतं

- हीरोची स्टार्ट-स्टॉप टेक्नॉलजी (Hero i3S) यात देण्यात आली आहे. ज्यामुळे या स्कुटरचं मायलेज चांगलं राहील. तसंच या स्कुटरच्या सीटखाली युएसबी पोर्ट देण्यात आला आहे.

- समोरच्या भागात टेलेस्कोपिक फोर्क आणि रियरमध्ये मोनोशॉक सस्पेंशन आहे.

- ही स्कुटर ब्लू, ब्राउन, ग्रे और रेड या चार मॅट फिनिश कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे.

- डेस्टिनी 125 नंतर हीरोची 125cc ची ही दुसरी स्कुटर आहे.

First published: May 18, 2019, 9:55 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading